गुन्हे वृत्त ठाणे

मुंब्रा पोलिसांची उत्तम कामगिरी ; 2 मोबाईल चोरट्यांना ठोकल्या बेड्या 18 महागडे मोबाईल जप्त

मुंब्रा :  ठाणे पोलीस दलातील मुंब्रा पोलिसांनी उत्तम कामगिरी बजावून 2 चोरट्यांना बेड्या ठोकल्या. तपासादरम्यान पोलिसांनी 2 लाख 40 हजार रुपयांचे 18 मोबाईल जप्त केले आहेत.

मुंब्रा पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. 65/18) भादंवि कलम 392, 34 नुसार दाखल असलेल्या गुन्ह्यांतील आरोपी मोहम्मद रफिक अहमद अस्लम शेख ऊर्फ चावल (21) व परवेज मोहम्मद इक्बाल कुरेशी (21) यांना 29 ऑगस्ट 2018 रोजी अटक केली. पोलीस कोठडीदरम्यान या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या माहिती 18 महागडे मोबाईल जप्त करण्यात आले. जप्त केलेले मोबाईल ठाणे शहर परिसरातील माजीवाडा, कापूरबावडी, कुर्ला, साकीनाका, घाटकोपरसह कुर्ला ते मुंब्रा रेल्वेस्थानकांदरम्यान चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
या आरोपींच्या अटकेमुळे अनेक गुन्हे उघडकीस येणार आहेत.
मोबाईल चोरट्यांना परिमंडळ 1 चे उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ, मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. सी. पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि गायकवाड, हवालदार (बक्कल नं. 2535) जाधव, पोना (बक्कल नं. 71), पोना (बक्कल नं. 6563) सदाफुले, पोना (बक्कल नं. 3731) पांलाडे, पोशि (बक्कल नं. 7325) जुवाटकर, पोशि (बक्कल नं. 7277) चव्हाण आदी पोलीस पथकाने अटक करण्यात मोलाची कामगिरी बजावली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!