महाराष्ट्र

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०१७-१८ साठी १०८ शिक्षकांची निवड; ५ सप्टेंबरला सातारा येथे पुरस्कार प्रदान सोहळा

मुंबई, दि. 1 : सन 2017-18 च्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर 108 शिक्षकांची निवड केलेली असून त्यामध्ये 38 प्राथमिक शिक्षक, 39 माध्यमिक शिक्षक, 18 आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक शिक्षक, 8 सावत्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, 2 विशेष शिक्षक (कला/क्रीडा) व 1 अपंग शिक्षक/अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक व 1 गाईड शिक्षक च 1 स्काऊट शिक्षक यांचा समावेश आहे. हा पुरस्कार वितरण कार्यक्रम दिनांक 5 सप्टेंबर 2018 रोजी सातारा येथे होणार आहे.

समाजाची नि:स्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने पुरस्कार दरवर्षी जाहीर करण्यात येतात.

राज्य शिक्षक पुरस्कार योजना 1962-63 पासून महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित असून, ती शालेय शिक्षण विभागामार्फत राबविली जाते. राज्य शिक्षक पुरस्काराची रक्कम 10 हजार रुपये आहे. तसेच राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दि. 4 सप्टेंबर 2014 च्या शासन निर्णयान्वये ठोक रक्कम एक लाख रुपये अदा करण्यात येते.

राज्य शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी दि. 16 जुलै 2018 च्या शासन निर्णयान्वये शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आली होती. समितीमध्ये शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे व यु.जे.करवंदे, प्राचार्य एस.एम. टी.टी. महाविद्यालय,कोल्हापूर हे शासकीय सदस्य तसेच प्रा.मोतीराम देशमुख, प्राचार्य गांधी विद्यामंदीर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, हरसुल,ता.त्र्यंबकेश्वर, जि.नाशिक, डॉ.नलिनी पाटील, प्राचार्य एस.एन.डी.टी बीएड कॉलेज,पुणे व अनिल कंगानी,मुख्याध्यापक, गुरुकुल (माध्यमिक) आश्रमशाळा, देवळापार, ता.रामटेक,जि.नागपूर या तीन अशासकीय सदस्यांच्या समावेश होता. शिक्षण सहाय्यक संचालक (माध्य.व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहिले.

याबाबतचा शासन निर्णय दि.28 ऑगस्ट, 2018 रोजी निर्गमित केला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!