ठाणे

गार्डियन एज्युकेशन व्यवस्थापनाच्या वतीने केरळ पुरग्रस्तांना मदतीचा हात

डोंबिवली :  निसर्गाचा कोप काय असतो ? ते आपण नुकतेच केरळमध्ये आलेल्या महापूरातून अनुभवले आहे. निसर्गापुढे माणूस किती सुज्ञ आहे हेही आपल्या लक्षात आले आहे. केरळमध्ये आलेल्या महापुरामुळे केरळमधील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक लोक बेघर झाले तर काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तेथील लोकांचे अतोनात हाल आपण बघितले आहेत.
अशा संकटातच आपल्याला माणूसकीचेही दर्शन होताना दिसते. या केरळमधील जनतेसाठी संपूर्ण देशातूनच नाही तर विदेशातूनही मदतीचे हात पुढे आले. यातच गार्डीयन एज्युकेशनल इन्स्टिट्यूटनेही आपला खारीचा वाटा उचललेला आहे. गार्डीयन एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये गार्डीयन आसीएसई बोर्ड, सीबीएसई बोर्ड आणि गार्डीयन हायस्कूल या तिन्ही इन्स्टिट्यूटमधून मदत करण्यात आली आहे.
एक सामाजिक बांधिलकी किंवा समाजाचे ॠण म्हणून गार्डीयन एज्युकेशनल इन्स्टिट्यूटने सढळ हाताने मदत केली आहे. ही मदत विविध जीवनावश्यक वस्तुंच्या स्वरुपात केली आहे. यात धान्य, कडधान्य, डाळी, तांदुळ, साखर, चहा पावडर इत्यादी. या सोबतच कपड्यांचीही मदत करण्यात आली आहे. जसे चादर, बेडशिट, साड्या, ड्रेस इत्यादी.
या शिवाय एक सर्वात महत्वाची मदत म्हणजे ‘पाणी’. एखाद्याला पाणी देणे हे भारतीय संस्कृतीत एक पुण्य मानले जाते. पाण्यालाच जीवन असेही म्हणतात. गार्डीयन शाळेने ही पाण्याची मदत बिसलरी बाटली केरळला पाठवून केली आहे.
गार्डीयन एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या या मदतीमुळे मुलांनाही खूप मोठी शिकवण मिळाली आहे. केरळमधील परिस्थितीची मुलांनाही जाणीव झाली आहे. गार्डीयन एज्युकेशनल इन्स्टिट्यूटने आपल्या कृतीतूल शाळेतील मुलांना धडा दिला आहे.
गार्डीयन एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर शालीया थॉमस, अ‍ॅनी वर्गीस, गार्डीयन स्कूलच्या प्रिन्सीपल शितल झोपे, गार्डीयन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिंधु हेमंत, गार्डीयन स्कूल सीबीएसईच्या मुख्याध्यापिका दिपाली गावडे यांच्या पुढाकाराने ही मदत दिली गेली.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!