गुन्हे वृत्त महाराष्ट्र

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचत पकडले सराईत दरोडेखोर

सोलापूर – पिस्तुल आणि १० जिवंत काडतुसांसह दोन दरोडेखोरांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात गुन्हे करून हे दोघेजण फरार होते. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दरोडेखोरांना अटक केली. या आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दिनेश रविंद्र क्षीरसागर (वय २४, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर), सचिन उत्तम महाजन (वय २४, सुरतवड, ता. इंदापूर, जि. पुणे) अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. गुन्हेगारांची माहिती काढण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, अजित कुंभार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका जबरी चोरीचा तपास करत होते. पोलिसांना एक सराईत गुन्हेगार ७० फूट रस्त्यावर येणार आहे अशी माहिती गुप्तदार बातमीदारांनी दिली होती.
पोलिसांनी सापळा रचून दिनेश क्षीरसागर याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याच्यासोबतच सचिन महाजन असल्याचे त्याने सांगितले. दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडून एक पिस्तुल आणि दहा जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यातील १६ हजार रुपये असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

दिनेश क्षीरसागर याने सोलापूर शहरातील एमआयडीसी आणि सदर बझार पेालीस ठाण्याच्या हद्दीत तीन दरोडे घातले होते. दोघे दरोडेखोरांनी मिळून पुणे जिल्ह्यातील यवत, वालचंद नगर परिसरात दरोडे घातले होते. पोलीस त्यांच्या मागावर होते. त्यांना अटक करण्यात सोलापूर शहर पोलिसांना यश आले.
पोलीस निरीक्षक सुर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, अजित कुंभार, सहाय्यक फौजदार दगडू राठोड, बायस, हवालदार राकेश पाटील, मंगेश भुसारे, संतोष फुटाणे, जयसिंग भोई, सुभाष पवार, वसंत माने, स्वप्नील कसगावडे, सोमनाथ सुरवसे, चालक निंबाळकर आणि काकडे यासर्व पोलीस पथकाने यशस्वीपणे कामगिरी पार पाडली. दरोडेखोरांना अटक केल्याने सोलापूर शहर आणि पुणे जिल्ह्यात दरोडे, घरफोड्याच्या घटनांवर काही प्रमाणात प्रतिबंध होणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!