ठाणे

कोकण विभागीय आयुक्त यांच्या मार्फत पेसा कायद्याबाबत मार्गदर्शन

जव्हार: कोकण विभागीय मा.आयुक्त श्री. जगदिश पाटील यांनी शुक्रवारी जव्हार येथील ग्रा.पं. दाभलोन पैकी वांगणपाडा या पेसा गावाला भेट देऊन तेथील ग्रामस्थांना पेसा कायद्याबाबत मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

गावाची प्रगती साधायची असेल तर महिला सक्षमीकरण अत्यावशक आहे असे आयुक्त यांनी यावेळी सांगितले. शासनच्या विविध उपक्रमांची माहिती देत जातीचे दाखले, जातपळताळणी, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना आदींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. आरोग्य आणि महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या तीन A(आशा – अंगणवाडी सेविका- ए एन एम) ह्या गावपातळीवरील कार्यप्रणाली हि आयुक्त यांनी यावेळी बघितली.

त्यांच्या समवेत पालघर जिल्ह्याचे मा.जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मिलिंद बोरीकर, जव्हार तालुक्याचे गट विकास अधिकारी श्री.अतुल पारसकर, महिला व बाल विकास अधिकारी श्री.राजेंद्र पाटील, वयम संस्थेचे अध्यक्ष श्री.विनायक थालकर आदि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

दौऱ्यादर्मियान आयुक्त यांनी विहिरीची पाहाणी केली व गावकऱ्याबरोबर रानभाज्या आणि भाकरी अश्या पारंपारिक भोजनाचा आनंद घेतला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!