“भारत बंद”मध्ये अंबरनाथकरांनी सहभागी होऊन कडकडीत पाळले बंद  * काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे उतरली रस्त्यावर

अंबरनाथ दि. ०८ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
      सातत्याने मोठ्या प्रमाणात होणाऱ्या इंधन आणि कर वाढीच्या निषेधार्थ आज अखिल भारतीय काँग्रेसने “भारत बंद”चे आवाहन केले होते. या बंदमध्ये अंबरनाथकर मोठ्या संख्येने सहभागी होऊन वाढत्या महागाईचा निषेध केला.  काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पश्चिमेकडील इंदिरा भवन येथून निषेध रॅली काढून अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजी चौक येथे समाप्त करण्यात आली. या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अंबरनाथ शहराध्यक्ष कुणाल सुभाष भोईर यांनी जाहीर पाठींबा दर्शवित “अंबरनाथ बंद” मध्ये सहभागी झाले होते. त्याचबरोबर सर्व नागरिक, व्यापारी, वाहनचालक, रिक्षाचालक मालक संघटना हे देखील या बंदमध्ये सहभागी होऊन या सत्ताधाऱ्यांचा शांततेच्या मार्गाने निषेध करत यशस्वीरित्या “अंबरनाथ कडकडीत बंद” ठेवण्यात आल्याची माहिती अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष व गटनेते प्रदीप पाटील यांनी दिली.
        काँग्रेसने काढलेल्या निषेध रॅलीमध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील, नगरसेवक सचिन पाटील, मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर सह काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. यशवंत जोशी, अनंत राजे, नगरसेवक उमेश पाटील, विलास हरिभाऊ जोशी, पंकज पाटील, महिला शहराध्यक्ष नीलिमा नायडू, रोहितकुमार प्रजापती, मनोज सिंग, उमाशंकर तिवारी, राजेश चलवादी, जाफर खान यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकरी, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
           “अच्छे दिन”चे पोकळ आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांसह, व्यापरी, उद्योजक, शेतकरी, कष्टकरी अशा सर्वांचेच जगणे मुश्किल केले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस आदी इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या सर्वांचा निषेध करण्यासाठी आज पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुकारलेल्या “भारत बंद”ला अंबरनाथमध्येहि यशस्वीरित्या कडकडीत बंद करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!