महाराष्ट्र

पोलीस आयुक्तालयाकडून गणेश मंडळांसाठी लेझीम स्पर्धेचे आयोजन

सोलापूर – डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालय पुढे सरसावले आहे. गणेशोत्सवामध्ये पारंपरिक वाद्य वाजवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने लेझिम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पार्क मैदानावर १७ व १८ सप्टेंबर या दोन दिवशी ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत पाटील यांनी दिली.

पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या संकल्पनेतून शहर पातळीवर १७ व १८ सप्टेंबर या दोन दिवशी सायंकाळी सायंकाळी ५ ते १० या वेळेत पार्क मैदानावर आल्याची माहिती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत पाटील यांनी दिली. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघाला २१ हजार, द्वितीय १४ तर तृतीय ७ हजाराचे बक्षिस असून प्रोत्साहनपर बक्षिसेही देण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त लेझिम संघांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहनही पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

स्पर्धेचे नियम व अटी –

या स्पर्धेत शहरातील कोणताही संघ सहभागी होऊ शकतो, प्रवेश विनामूल्य आहे.

लेझीम संघात स्पर्धकांचा गणवेष एकच असावा. गणवेष नसेल तर पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत.

संघात कमीत कमी 60 जण असले पाहिजेत, मुलींच्या संघाला प्राधान्य देण्यात येईल.

स्पर्धेदरम्यान शिस्त आणि वेळेचे बंधन पाळले पाहिजे.

वाद्य स्वत:च आणले पाहिजे, स्पीकरची व्यवस्था करण्यात येईल.

गणेशोत्सव आणि मोहरम या सणांमध्ये जातीय सलोखा वृध्दींगत व्हावा तसेच सण-उत्सव डॉल्बीमुक्त करून पारंपारिक वाद्यांना प्रोत्साहन देणे, हा या स्पर्धेचा उद्देश आहे. विजेत्यांना रोख बक्षिस तसेच ढाल आणि दोन संघाला प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेत मोठ्या संख्येने लेझिम व ढोल संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुर्यकांत पाटील यांनी केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!