डोंबिवली :- ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील सात जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन पाणी अडवा , पाणी जिरवा, पाणी वाचवा असे संदेश देत साता-याच्या माण तालुक्यातील रांजणी गावात जलयुक्त शिवारासाठी जोरदार प्रयत्न केला. यात गावातील प्रत्येक नागरिकाने दिवसातून दोन तास यासाठी श्रमदान केले .
डोंबिवलीकर पाणी फौंडेशनने सुरु केलेल्या समाजकार्याचे मंत्री महादेव जानकर यांनी कौतुक करत पाहणी केली होती. फौंडेशन अध्यक्ष नानासाहेब दोलताडे यांच्या डोंबिवली येथील निवासस्थानी पाणी बचतीच्या `श्री गणेशा`ची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. डोंबिवलीकर पाणी फौंडेशनपाणी बचतीचा संदेश देणारी आरास केली आहे.
डोंबिवलीकर पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यात येत आहे.डोंबिवली येथील गोपाळ नगर मधील गोपाल स्मृती इमारतीत राहणारे नानासाहेब दोलताडे यांच्या घरातील गणपतीत पाणी अडवा पाणी जिरवा हि संकल्पना माडण्यात आली आहे. दोलताडे या संस्थेचे अध्यक्ष आहेत.साता-याच्या माण तालुक्यातील रांजणी गावात डोंबिवलीकर फाउंडेशन च्या वतीने पाणी बचतीचा संदेश देणारी आरास केली आहे.अमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन च्या जलयुक्त शिवार स्पर्धेत ते सहभागी झाले होते. लोकसहभागातून व श्रमदानातून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची सोय तालुक्यासाठी करण्यात आली आहे.गेल्यावर्षी या प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले होते.डोंगरावर पडणारे पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवले जाते. तेच पाणी वाचवले जाते व उपयोगी आणले जाण्याचे जलव्यवस्थापन डोंबीवलीकर फाउंडेशन वतीने राबविले जात आहे. एकूण पंधरा शेततली तयार करण्यात आली आहेत. तालुका जवळपास टँकरमुक्त झाला आहे असल्याचे यावेळी नानासाहेब दोलताडे यांनी सांगितले.