महाराष्ट्र

डिजिटल व्हॅन द्वारे स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ….

पालघर:- केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने दि. १५ सप्टेबर ते ०२ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ डिजिटल स्वच्छता व्हॅनद्वारे स्वच्छतेचे माहिती पट दाखवून करण्यात आला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्रीम संघरत्ना खिल्लारे , ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. अशोक पाटील पालघर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री.उमतोल व श्री.डाढाले उपस्थित होते
स्वच्छतेबाबत व्यापक जाणीव जागृती निर्माण व्हावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीना सुचना दिल्या आहेत. स्वच्छता ही सेवा अभियानाच जिल्हा स्तरावरील शुभांरभ डिजिटल व्हॅनद्वारे करण्यात आला असून ही डिजिटल व्हॅन दिनांक 15 सप्टेबर ते 02 ऑक्टोबर 2018 या कालावधीत पालघर जिल्हा परिषदे अंतर्गत जिल्हातील आठही तालुक्यातील ग्रामपंचायती, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक गर्दीची ठिकाणे, आठवडी बाजार यांमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाची व स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. या विविध माध्यमातून ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याससोबत पाण्याचे स्त्रो्त तसेच सार्वजनिक परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे. शौचालयाचा नियमित वापर, हात धुवण्याचे महत्व, सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन, प्लास्टिक व थर्माकॉल बंदी याबाबत जनजागृती करून गाव शाश्वत स्वच्छ राहण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत माहीती डिजिटल व्हॅनद्वारे देण्यात येणार आहे.
स्वच्छ्ता ही सेवा हे विशेष अभियान दिनांक 2 ऑक्टोंयबर 2018 पर्यंत चालेल. यात दिनांक 15 व 16 सप्टें बर रोजी जागरुकता अभियान, दिनांक 16 ते 30 सप्टेोबर दरम्यान शौचालय निर्मिती, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, श्रमदान व समग्र स्वाच्छता, स्वच्छाग्रही से स्वच्छाग्रही तर दिनांक 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. यासाठी तालुका व गावस्तरावर महाश्रमदान तसेच स्वच्छता विषयक विविध उपक्रम गटविकास अधिकारी सर्व,विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक यांनी शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार उपक्रम राबवावेत असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!