ठाणे

उल्हासनगर महापालिकेची महापौर पदाची रंगत वाढली

उल्हासनगर (सोनू हटकर) :  काही दिवसांपूर्वी भाजपच्या उल्हासनगर महानगरपालिकेतील महापौर मीना कुमार आयलानी यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला,मात्र आता महापौर पदाची निवडणूक जाहीर झाल्यावर सत्ताधारी भाजपाला ही निवडणूक अंगाशी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे..

 

आज महापौर पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती, दिलेल्या मुदतीत भाजपा आणि साई पक्षातर्फे पंचम कलानी यांनी आपला अर्ज सादर केला तर शिवसेना,आरपीआय,भारिप,काँग्रेस,राष्ट्रवादीच काँग्रेस यांनी साई पक्षातील नगरसेविका ज्योती पिंटू भाटीजा यांनी आपला अर्ज महापालिका सचिवांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पालिका वर्तुळ एकच खळबळ माजली आहे .कारण साई पक्ष हा भाजपा सोबत असल्याने साई पक्षात फूट पडली की काय अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे, सुत्रांडून मिळालेल्या माहितीनुसार साई पक्षातील सात नगरसेवक हे शहरातून दोन दिवसांपासून गायब असून त्यांना गोवा येथे पाठवले असल्याचे बोलले जात आहे. मात्र साई पक्ष हा भाजपा सोबत खेळी खेळत असल्याचे समोर येत आहे,

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!