ठाणे

मुख्यमंत्री शब्द पाळत नाहीत ….. संघर्ष समितीची जाहीर टीका …

डोंबिवली  :- दि. २५ ( शंकर जाधव ) कल्याण –डोंबिवली महानगरपालिकेत २७ गावे समाविष्ट होऊन दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. मात्र अजूनही संघर्ष समितीचा संघर्ष सुरूच आहे. निवडणुकीच्या काळात आश्वासन दिले दिले होते. मात्र अद्याप या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळत नाहीत अशी खरमरीत टीका समितीच्या सभेत अध्यक्ष गंगाराम शेलार यांनी केली. तसेच आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असून आता या राजकारण्यांना आपली गरज भासेल असे समितीचे अध्यक्ष गंगाराम  शेलार यांनी सांगितले.

मानपाडेश्वर मंदिराच्या आवारात संघर्ष समितीची जाहीर सभा पार पडली. यावेळी अध्यक्ष गंगाराम शेलार,  सरचिटणीस गुलाब वझे, पदाधिकारी चंद्रकांत पाटिल, वंडार पाटील अर्जुनबुवा चौधरी, वसंत पाटील, बलीराम तरे, इत्यादी मान्यवरांनी उपस्थित सदस्यांना आणि गावकऱ्यांन मार्गदर्शन केले. या सभेतसमितीच्या कार्यकारिणीतील नवनियुक्त सुमारे १५० पदाधिकाऱ्यांना नियुक्ति पत्रे देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जो पर्यत २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका होत नाही, तिकडील १० गावातील शेतकऱ्याची मागणी पूर्ण होत नाही

तो पर्यत ग्रोथ सेंटर होऊ देणार नाही असे सरचिटणीस गुलाब वझे यांनी यावेळी सांगितले. पुढे वंडार पाटील म्हणाले, सरकार कुठेही असुदे, पक्ष कुठे असू दे, जेव्हा संघर्ष समिती विरोधात जाईल तेव्हा आम्ही पहिला समाज नंतर पक्ष अशी भूमिका बजावू. कल्याण,ठाणे,पनवेल, अंबरनाथ,भिवंडी या तालुक्यातील गावकऱ्यांनी आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शासनाला संघर्ष समितीशी बोलणे करावेचा लागेल. वंडार पाटील म्हणाले, समितीचा संघर्ष अंतिम टप्पावर आली असून त्यासाठी आता मावळे तयार आहेत. अध्यक्ष गंगाराम शेलार यांनी आपल्या भाषणात थेट मुख्यमंत्र्यावर टीका केली. ते म्हणाले, २७ गावाची स्वतंत्र नगरपालिका करू असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी समितीला आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन अद्याप पूर्ण झाले नाही.त्यामुळे मुख्यमंत्री दिलेले शब्द पाळत नाही असे जाहीत टीका केली.

२७ गावातील दस्त नोंदणी सुरु करण्यासाठी समितीचा संघर्ष …

गेली अनेक महिने २७ गावतील दस्त नोंदणी बंद असल्याने याचा त्रास बांधकाम व्यवसायिकांना असल्याचे सांगत खूप आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे २७ गावतील दस्त नोदणी पुन्हा सुरु करावी अशी मागणी समितीने केली आहे.गंगारामशेठ पाटील, पांडुशेठ म्हात्रे, अँड शिवराम गायकर, रमेश ठाकूर, विजय भावे, विठ्ठल वायले, कैलास जोशी  इत्यादी नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी आपले विचार मांडले.यावेळी समितीचे सरचिटणीस चंद्रकात पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!