पालघर: बालकांच्या बौद्धिक, शारिरीक आणि सर्वांगीण विकासासाठी सर्व विभागांच्या समन्वयाने राबविण्यात येत असेले पोषण अभियान पालघर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे यासाठी सर्व अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्यसेविका, आशा स्वयंसेवीका यांचे अभिनंदन पालघर जिल्हा परिषदेच्या मा.महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती श्रीम.धनश्री चौधरी याने केले, त्या पालघरच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण अभियान अंतर्गत उत्कृष्ट अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्यसेविका, आशा स्वयंसेवीका यांच्या गुणगौरव सोहोळ्यात बोलत होत्या. पालघर जिल्ह्यात टाटा ट्रस्ट, इम्पेक्त इंडिया अश्या स्वयंसेवी संस्थांचे कुपोषण निर्मुलांच्या कार्यात मोठे योगदाना आहे आणि त्यांच्या सहकार्याने पालघर जिल्हा येत्या काळात कुपोषण मुक्त घोषित होईल अशी आशा यावेळी बोलताना सभापती यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमामध्ये AAA कार्यप्रणाली अंतर्गत कासा प्रकल्पातून श्रीम. संगीता भोईर, श्रीम.राजेश्री बसवत आणि श्रीम. एस. आर. गोसावी, तलासरी प्रकल्पातून श्रीम.संगीता बोबडे, श्रीम.उषा चौधरी आणि श्रीम.पी.बी. कांबळे, वसई १ प्रकल्पातून विजया मेहेर, विद्या वैती आणि विद्या शिंदे, वसई २ प्रकल्पातून सुलभ जाधव, गौरी कामडी आणि सुरेखा चव्हाण, वाडा प्रकल्पातून संगीता रोज, सुवर्णा रोज आणि जिजा सातवी, वाडा प्रकल्पातून मनीषा खंडागळे, सुधा सातवी आणि लता गाडणे, डहाणू प्रकल्पातून गुलाब गवळी, श्रेया खरपडे आणि शोभा खरपडे, जव्हार प्रकल्पातून प्रियांका दिघा, अमिता बोरसे, ललिता फाडवळे, जव्हार प्रकल्पातून नाजु बोरसे, अलका घाटाळ, एम मावले, विक्रमगड प्रक्लापातून सुमन राऊत, उषा दिवा, सिंधू चौधरी, पालघर प्रकल्पातून जिया वडे, भारती घरत, विद्या पाटील, मनोर प्रकल्पातून मेघा पवार, संगीता वावरे, अलका वाघ, मोखाडा प्रकल्पातून भागीरथी जाधव, मनीषा पाटील, रेणुका पदिकार यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रसंगी डॉ. रुपाल दलाल, बालरोगतज्ञ, डॉ. अंबादास आढाव, प्रकल्प व्यवस्थापक इंपॅक्ट इंडिया, डॉ. अभिजित खंदारे, डॉ. नवनाथ घनतोडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी मनोर यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. यावेळी सुप्रभा अग्रवाल, संचालक, राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशन, महारष्ट्र शासन, श्री. टी. मधुसूदन राव, पोषण तज्ञ, टाटा ट्रस्ट, पंचायत समिती पालघरच्या मा.सभापती श्रीम. मनीषा पिंपळे, मा.महिला बाल कल्याण अधिकारी श्री. राजेंद्र पाटील, सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. रोहंत प्रधान टाटा ट्रस्ट यांने केले.