भारत

आधार मोबाईल नंबरशी जोडणं आवश्यक नाही – सुप्रीम कोर्ट

मुंबई, 26 सप्टेंबर : आधार मोबाईल नंबरशी जोडणं आवश्यक नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. बॅंक अकाऊंटसाठी आधारची सक्ती नाही.

‘आधार’ची सक्ती अवैध असा निर्वाळा कोर्टाने केला आहे. त्यामुळे कोर्टाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा दणका बसला आहे. सुप्रीम कोर्टाचा अतिशय महत्वाचा निर्णय आहे. पॅन कार्ड आणि आयकर परताव्यासाठी आधार आवश्यक आहे.

हक्कांवर योग्य निर्बंध घालणं हा सरकारचा अधिकार आहे. आधारमुळे दुर्लक्षित घटकांचं सशक्तीकरण झालं असं मत सुप्रीम कोर्टानं नोंदवलं आहे. तर बोगस आधार क्रमांक बनवणं आता अशक्य असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.

वैशिष्ट्यपूर्ण असणं म्हणजे एकमेव असणं असं मत नोंदवत आधार शक्य तेवढी कमी माहिती गोळा करतं असं कोर्टाने निरीक्षणाद्वारे म्हटलं आहे. ‘आधारमुळे लोकांचा फायदा होतो हे नाकारता येत नाही, ‘आधार’ महाकाय इलेक्ट्रॉनिक लगाम हा आक्षेप आहे असं न्या. सिक्री यांनी निकाल वाचताना म्हटलं आहे.

आधार हे त्याच्या वैशिष्ट्यामुळे महत्त्वाचं असल्याचं न्यायमूर्ती सिक्री म्हणाले. तर गेल्या काही काळात आधारबाबत बरीच चर्चा झाली. आधार ही आता व्यक्तींची ओळख बनली आहे असं मत आता सुप्रीम कोर्ट व्यक्त करत आहे. एकूण 40 पानांचा हा निकाल आहे.

शिक्षणामुळे आपण बोटाच्या ठशापासून स्वाक्षरीपर्यंत पोहोचलो. आधार हा माहितीचा संचय आहे. आधारसाठी पुरेशा सुरक्षा उपाय असणं महत्त्वाचं आहे. परवानगीशिवाय माहिती उघड केली जाणार नाही. तर आधारच्या कलम 33 ब रदद् करण्याची सूचना कोर्टाकडून देण्यात आली आहे. तर खाजगी कंपन्यांनी बायोमॅट्रिकची माहिती उघड करू नये असं निरीक्षण न्यायालयाने मांडलं आहे. तर खासगी कंपन्यांबाबतचं कलम 57 कोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे आता खाजगी कंपन्या आधारची माहिती वापरू शकणार नाही. तर शाळांमध्येही आधार कार्ड सक्ती काढून घेण्यात आली आहे.

या अंतिम निकाल वाचनावेळी आधारमुळे वैयक्तिक स्वांतत्र्याचा भंग होतो का ? असा सवाल सुप्रीम कोर्टानं उपस्थित केला आहे. आधारची वैशिष्ट्यपूर्णता हाच आधार आणि इतर ओळखपत्रांमधला फरक आहे. समाजाच्या अनेक घटकांना आधारमुळे फायदा होतो. आधारसाठी कमीत कमी माहितीची गरज आहे. आधारमुळे फायदा झाल्याचा अनेक अनेकांचा दावा आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!