गुन्हे वृत्त

कल्याण डीसीपी आणि प्रांत कार्यलयासमोर  रिक्षात सापडले स्फोटके

कल्याण : कल्याण पश्चिमेकडील डीसीपी व प्रांत कार्यलय असलेल्या इमारतीच्या समोर एका रिक्षात चार डीटोनेटर व दोन जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत चारही डिटोनेटर आणि जिलेटीनच्या कांड्यासह रिक्षा चालकाला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू केली आहे. दरम्यान कार्यलयाच्या आवारात मिळालेल्या चिठ्ठीमुळे सदर प्रकार उघडकीस आला. प्रांत ऑफीसला तीन शेतकरी महिला या रिक्षातून आल्या होत्या.

कल्याण पश्चिम येथील वायले नगर परिसरात एका इमारती मध्ये मध्ये तळमजल्यावर डीसीपी कार्यलय, पहिल्या मजल्यावर निवडणूक तर दुसर्या मजल्यावर प्रांत कार्यालय आहे. अशा तीन महत्वाचे शासकीय कार्यलय असलेल्या या इमारतीच्या परिसरात स्फोटके सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. या रिक्षामध्ये अंबरनाथ तालुक्यातील वसाद गावामध्ये राहणाऱ्या तीन शेतकरी महिला आपल्या कामानिमित्त प्रांत कार्यलयात आल्या होत्या. खडकपाडा पोलिसांनी स्फोटके जप्त करत पुढील तपास सुरु केला आहे सबंधित महिलांचा जमिनीचा वाद सुरु असल्याने कट रचून महिला आणि रिक्षा चालकाला फसविण्यासाठी हे विस्फोटक ठेवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 डीसीपी कार्यलयसमोर पोलीस  कर्मचार्याला एक चिठ्ठी मिळाली एका रिक्षात स्फोटक ठेवण्यात आले आहे असे नमूद करण्यात आले होते. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत रिक्षाचा शोध सुरु केला. पोलिसांनी तत्काळ बॉम्ब शोधक पथक पाचारण केले तत्काळ बॉम्ब शोधक पथक घटना स्थळी पोहचले. एका रिक्षा मध्ये चार  डीटोनेटर व दोन जिलेटीन च्या कांड्या आढळून आल्या.  या रिक्षातून अंबरनाथ तालुक्यातील वसाद गावातील तीन शेतकरी महिला प्रांत कार्यलयात आल्या होत्या. या महिलांच्या नावावर असलेल्या जमिनीचे प्रकरण प्रांत कार्यलयात सुरु आहे. सदर रिक्षा चालक हि वसाद गावात राहतो या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. या तीन महिला आणि रिक्षा चालकाला फसविण्यासाठी हे विस्फोटक ठेवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त करत पुढील तपास सुरु केला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!