ठाणे

डोंबिवलीत २० रुपयांत ` आपल जेवण`…    

डोंबिवली  :- दि. २८ ( शंकर जाधव  ) कष्टकरी रिक्षा चालक,फेरीवाले,नाका कामगार,श्रमिक कष्टकरी,यांच्या करिता लाल बावटा रिक्षा युनियन व प्रमोद कोमास्कर सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अवघ्या २०  रुपयात  ‘`आपलं जेवण` योजनेचे औपचारिक उदघाटन महापौर विनिता राणे  यांचे  हस्ते पहिली थाळी  देऊन सुरु  करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना महापौर विनिता राणे म्हणाल्या,पक्ष कोणताही असला तरी रिक्षा युनियनने सुरु केलेला उपक्रम  अतिशय स्तुत्य असून सध्याच्या महागाईच्या दिवसात याला महत्व आहे. गरीब व कष्टकरी लोकांसाठी सुरु केलेल्या उपक्रम  मला त्यानी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी काॅॅम्रेड जी. एल. रेडडी, काळू कोमास्कर,बसपा प्रदेश सचिव दयानंद किरतकर,  रिक्षा सेनेचे संजय मांजरेकर, भाजप प्रणित रिक्षा चालक-मालक संघटनेचे दत्ता माळेकर   आदि उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!