ठाणे

दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचा 9 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

दिवा (बातमीदार)- दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचा 9 वा वर्धापन दिन नुकताच अवधूत हॉल, दिवा पूर्व येथे मोठ्या उत्साहात पार पडला, यावेळी रेल्वे प्रवाशांसाठी विशेष काम करणाऱ्या व्यक्तींचे रेल्वे प्रवासी मित्र असे सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोटीयन व ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख, चेतन पाटील, रोहिदास मुंडे, प्रशांत पाटील, प्रवीण उतेकर, रोशन भगत, नवनीत पाटील, मयूर भगत, गोवर्धन भगत आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवातीला संघटनेची स्थापना कधी झाली, आतापर्यंत कोण कोणती रेल्वेची कामे संघटनेमुळे झाली असून तसेच अजून कोणत्या कामांचा पाठपुरावा संघटना घेत आहे हे थोडक्यात संघटनेचे अध्यक्ष एड आदेश भगत यांनी सांगितले. मुंबई दिशेकडील पादचारी पूल पूर्वेला जोडण्यासाठी थेट स्थानकावर बसून केलेलं लाक्षणिक उपोषण, कोकण रेल्वे थांब्यासाठी दिव्यात भरवलेली रेल्वे परिषद, जलद गाड्याच्या थांब्यासाठी केलेला पाठपुरावा, स्वच्छता अभियान, कल्याण दिशेकडील पादचारी पुलाचा पूर्वेला विस्तार, सरकता जीना, आरोग्य केंद्र अशा अनेक लहान मोठ्या गोष्टी दिवेकर प्रवाशांच्या सहकार्याने मागील नऊ वर्षात करणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवासी संघटनेचे बळीराम भोसले, नितीन चव्हाण, संदीप कदम, सौ दिव्या मांडे, सुचिता गुरव, सिद्धेश धुरी, सुनील भोसले, युवराज पवार, आशिष कांबळे, विनायक सावंत, गणेश मोहिते, प्रसाद भोईर, राकेश मोर्या, अशोक सावंत, दत्तात्रय सावंत, लक्ष्मण नाईक, विकास चव्हाण, प्रदीप पालसंबकर, मारूती खोत, प्रवीण पार्टे, रवींद्र निवड, दिनेश गुप्ता, विजय पुजारी, सूर्यकांत खेतले, रमेश बुडबाडकर, वसंत घाडिगावंकर, नरेश पाडावे, मनोज सावंत, विनोद राणे, दत्तात्रय सावंत, अजय परब आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन अजित कदम यांनी केले.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!