महाराष्ट्र

सोलापूरात गोदुताई वसाहतीमधील स्वच्छता मोहिमेत १५० टन कचरा संकलन

ठळक मुद्दे- स्वच्छता मोहिमेत शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग- माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांचा सक्रीय सहभाग- महिलांची संख्याही लक्षणीय, परिसरात स्वच्छता

सोलापूर (प्रकाश भगेकर ): महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मंगळवार २ आॅक्टोबर २०१८ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली कॉ गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती़ या मोहिमेत वसाहतीमधील १५० टन ओला, घन, सुका कचरा संकलन करून परिसर स्वच्छ करण्यात आला.

या मोहिमेत सभासद संस्थेचे संचालक, पदाधिकारी, विद्यार्थी, तरुण, महिला व सामाजिक संघटना आदींचा सक्रीय सहभाग होता़  यावेळी सिटुचे महासचिव एम एच शेख युसूफ शेख, मेजर नसीमा शेख, शेवंता देशमुख, कूर्मया म्हेत्रे, फातिमा बेग, अनिल वासम, अशोक बल्ला, नरसिंग म्हेत्रे, हसन शेख, वसीम मुल्ला, वसीम देशमुख, वीरेंद्र पद्मा, दीपक निकंबे, सनातन म्हेत्रे, आप्पाशा चांगले, बापू साबळे, किशोर मेहता, बाबू कोकने, रफीक काझी, प्रभाकर गेंटयाल, राजू गेंटयाल, नरेश गुल्लापल्ली, नवनीत अंकम, नितिन कोळेकर, मायप्पा मस्के, रवि म्हेत्रे, मनोज बल्ला, धानेश जत्ती, अंबादास वासी, बालकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, मल्लिकार्जुन बेलियार, मोहन कोक्कूल, मोहन बडगु, अल्लाउद्दीन शेख, संतोष पुकाळे, अरुणा गेंटयाल आदी उपस्थित होते.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!