गुन्हे वृत्त

गांजा तस्करी करणाऱ्या बुवाला ठोकल्या बेड्या 1.10 लाखाचा गांजा जप्त

मुंबई : गांजा तस्करी करणाऱ्या 63 वर्षीय बुवाला 2 ऑक्टोबर 2018 रोजी अटक करण्यात आली आहे. ही उत्तम कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप यादव यांना मिळालेल्या माहितीनुसार मालवणी पोलिसांनी केली. कारवाई दरम्यान पोलिसांनी 1 लाख 10 हजार रुपयांचा 5 किलो 400 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
मालवणी येथील महाकाली कच्चा रस्ता, मार्वे मार्ग येथे गांजा घेऊन एक इसम येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त दिपील यादव यांना खबऱ्याने दिली. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा लावून श्रीकांत लोके ऊर्फ आर. के. ऊर्फ बुवा याला ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता बुवाकडे 5 किलो 400 ग्रॅम गांजा आढळून आला. या गांजाचे मूल्य 1 लाख 10 हजार रुपये आहे. या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. 330/18) एनडीपीएस अॅक्ट कलम 8(क), 20(ब), 29 नुसार गुन्हा दाखल करून श्रीकांत लोके ऊर्फ आर. के. ऊर्फ बुवा याला अटक केली.

ही उत्तम कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवणी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक हिदळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कोरगावकर, हवालदार कदम, हवालदार पाटील, हवालदार पट्टेकर, पोलीस शिपाई गोसावी, पोलीस शिपाई जाधव, पोलीस शिपाई ग्राम या पथकाने केली.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!