ठाणे

प्लास्टिक पिशव्यांचा वापरणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतील  दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु …  चार दिवसात १ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल ….

 डोंबिवली :- दि. ०४ ( शंकर जाधव  ) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कल्याण- डोंबिवली महानगरपालिका यांनी १ ऑक्टोबरपासून सुरु केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या कल्याण पश्चिम आणि डोंबिवली पूर्वेकडील दुकानादारांवर  केलेल्या कारवाईत एकूण १ लाख ६५ हजार रुपये दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. या दुकानांवर महाराष्ट्र प्लास्टिक पिशव्यांचे ( कॅरीबॅग ) ( उत्पादन व वापर ) नियम २००६ आणि महाराष्ट्र विघटनशील घनकचरा नियम २००६ अन्वये कारवाई करण्यात आली. मात्र अद्याप २७ दुकानदारांवर  कारवाई कधी होणार असा प्रश्न विचारला जात आहे.

     ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्या घाऊक दुकानदारांवर आणि त्यांचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून पालिका प्रशासन आणि महराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चार दिवसात १ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल केला. या कारवाईत ११६८ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आले.  प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी विशाल मुंडे, घनकचरा व्यवस्थापन डोंबिवली विभागाचे सहाय्यक सार्वजनिक आरोग्याधिकारी विलास जोशी, मुख्य आरोग्य निरीक्षक वसंत देगलूरकर यासह कर्मचारीवर्ग  यांनी हि कारवाई केली.याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी विशाल मुंडे म्हणाले, ज्यावेळी ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्या घाऊक दुकानदारांवर आणि त्यांचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश आले. त्यावेळी दुकानदारांनी अचानक हि कारवाई का केली जात आहे ? आम्हाला पर्यायी व्यवस्था करू द्या अशी मागणी केली होती. राज्य सरकारने त्यासाठी तीन महिन्याची मुदत देत दुकानदारांनी दुकानातील ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या प्लास्टिक कलेक्शन सेंटरला जमा करावे असे निर्देश दिले होते. १ ऑक्टोबरपासून संपूर्ण राज्यात विशेष मोहिमे सुरु झाली आहे. घनकचरा व्यवस्थापन डोंबिवली विभागाचे सहाय्यक सार्वजनिक आरोग्याधिकारी विलास जोशी म्हणाले, कल्याण पश्चिम आणि डोंबिवली पूर्वेला कारवाई सुरु झाली आहे. काही दिवसात  कल्याण पूर्व आणि डोंबिवली पश्चिमेला तसेच २७ गावात कारवाई सुरु केली जाईल.कारवाई दरम्यान एका दुकानदाराने पालिका अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली होती. फक्त वाॅॅर्निग द्या, दंड घेऊ नका असे म्हणत त्या दुकानदारांने अधिकाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. मात्र कारवाईसाठी बोलावण्यात आलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करून दुकानदाराला दंड भरण्यास सांगितले. काही वेळाने त्या दुकानदारांने दंड भरण्याची तयारी दर्शविली.

२७ गावातील दुकानदारांवर कारवाई करण्यास पालिका एक पाऊल मागे …

२७ गावात कर वसुलीवर जास्त लक्ष द्यावे असे फर्मान पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी काढले होते. मात्र ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्या घाऊक दुकानदारांवर आणि त्यांचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास पालिका पप्रशासन एक पाऊल मागे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!