क्रिडा

राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्रातील ४४ स्पर्धक सहभागी; विजेत्या समूहाला रशियामध्ये आयोजित जागतिक स्पर्धेत संधी मिळणार

नवी दिल्ली, दि. 4 :  विविध कौशल्यावर आधारित स्पर्धेचे आयोजन केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाच्या वतीने एरोसीटी येथे 3 ते 5 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे.  या स्पर्धेत महाराष्ट्रातील 44 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विजेत्या आणि उपविजेत्या समूहाला जुलै 2019 मध्ये रशियातील कझान येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे.

राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह  26 राज्ये सहभागी झाली आहेत. विविध कौशल्यावर आधारित 45  दालने या ठिकाणी आहेत. यामध्ये 400 पेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे. विशेष म्हणजे दिव्यांगांसाठी  या ठिकाणी 10 कौशल्य आधारित दालने  आहेत.

महाराष्ट्रातील 44 स्पर्धकांनी विविध 22 कौशल्यावर आधारित दालने येथे उभारली आहेत. यामध्ये इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन,पुष्पगच्छ तयार करणे, वेल्डींग, इंण्डस्ट्रियल कंट्रोल, मोबाईल रोबोटिक,  मेकेट्रॉनिक, कॅबिनेट मेकिंग, वॉल फ्लोवर टायलिंग, ऑटोमोबाईल टेक्नोलॉजी, विटा बनविणे, रेफ्रिजरेशन एण्ड एयर कंडीशन, ब्युटी थेरपी, हेयर ड्रेसिंग, ज्वेलरी, 3 डी गेम आर्ट,फॅशन टेक्नोलॉजी, प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजी, ग्राफीक डिझाईन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन नेटवर्क केबलिंग, आयटी सॉफ्टवेअर सोल्युशन फॉर बिझनेस आदी कौशल्यांचा समावेश आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!