गुन्हे वृत्त

2 अट्टल घरफोड्यांना ठोकल्या बेड्या ; एमएचबी कॉलनी, बोरिवली, मालाड, खार, व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यांमधील 7 गुन्ह्यांची उकल

मुंबई : रात्री अपरात्री घरफोड्या करणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना एमएचबी कॉलनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही उत्तम कामगिरी पोलीस उपनिरीक्षक विजय धोत्रे यांनी पोलीस पथकासह केली. या आरोपींकडून पक्कड, स्क्रू ड्रायव्हर, पान्हा, लॅपटॉप, कॅमेरा, रोकड असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त तपासादरम्यान जप्त करण्यात आला आहे. आरोपी पोलिसांच्या हाती लागल्यामुळे एमएचबी कॉलनी (3 गुन्हे), बोरिवली, मालाड, खार, व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यांमधील 7 गुन्हे उघडकीस आले आहेत. दोन्ही आरोपी एमएचबी कॉलनी पोलिसांच्या कोठडीत असून आणखी गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने एमएचबी कॉलनी पोलीस तपास करत आहेत.

दहीसर पश्चिम येथील आयसी कॉलनी परिसरात घरफोड्यांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चोरट्यांना ताबडतोब तुरुंगात धाडण्याचे आदेश दिले. या.आदेशाचे पालन म्हणून गुन्हे प्रकटीकरण पोउनि विजय धोत्रे व पोलीस पथकाने चोरट्यांचा शोधासाठी हद्दीत गस्त वाढवली. रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना पोलिसांच्या वाहनाला पाहून 2 जणांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून मकसुद ऊर्फ फिरोज मोहम्मद सिद्धिकी शेख (23), अजिम अजीज अली (27) यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे स्क्रू ड्राईव्हर, पान्हा, पक्कड आढूळ आले. या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी एमएच कॉलनी परिसरात 3 ठिकाणी तर बोरिवली, मालाड, खार, व्ही. पी. रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या केल्याची माहिती दिली. पोलीस कोठडीदरम्यान आरोपींकडून लॅपटॉप, कॅमेरा, रोकड असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या अट्टल चोरट्यांना अटक व अन्य गुन्ह्यांची उकल परिमंडळ 11 चे उपायुक्त संग्रामसिंग निशानदार, सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकिशोर मोरे, वपोनि पंडित ठाकरे, पोनि लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे पोउनि विजय धोत्रे, पोउनि प्रवीण निरगुडे, हवालदार शेख, शिंदे, पोना मोरे, शेख, पोशि सुरवसे, शिरसाठ, तडवी, कोकिटकर, तावडे, बोबडे आदी पोलीस पथकाने केली.

उघडकीस आलेले गुन्हे

एमएचबी कॉलनी पोलीस ठाणे : – (गु. र. क्र. 300/18), ( गु. र. क्र. 303/18), (गु. र. क्र. 314/18)

बोरिवली पोलीस ठाणे : – (गु. र. क्र. 388/18) भादंवि कलम 457, 380

मालाड पोलीस ठाणे : – ( गु. र. क्र. 499/18) भादंवि कलम 457, 380

खार पोलीस ठाणे : – (गु. र. क्र. 369/18) भादंवि कलम 457, 380

व्ही. पी. रोड पोलीस ठाणे : – (गु. र. क्र. 234/18) भादंवि 457, 380

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!