ठाणे

डोंबिवलीत भारतीय पोस्ट योजना शिबीर संपन्न

डोंबिवली :- दि. ०८ ( प्रतिनिधी )   स्व. शिवाजीदादा शेलार मित्र मंडळ अनुगामी लोकराज्य महाभियान डोंबिवली पूर्व यांच्या वतीने शेलार चौक येथील भाजप नगरसेवक साई शेलार यांच्या जनसंपर्क कार्यालयात  भारतीय पोस्ट योजना शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,अटल पेन्शन योजना,सुकन्या समृद्धी खाता सरकारी डाक विभाग बचत खाता यांची माहिती नागरिकांना देण्यात आली. यावेळी भाजप पदाधिकारी राजू शेख म्हणाले, डोंबिवलीतील नागरिकांच्या मागणीनुसार  भारतीय पोस्ट योजना शिबीर भरविण्यात आले. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेतल्याने खऱ्या अर्थाने गोरगरीब नागरिकांना व्हावा हा या मागचा उउद्देश आहे. देशातील कुठल्याही ओळखपत्राच्या आधारावर देशातील कुठल्याही पोस्टात केवळ ५० रुपयात सरकारी डाक विभाग बचत खाते उघडता येऊ शकते. यात खाते उघडल्यावर डेबिट कार्ड दिले जाते. यात साक्षीदाराची गरज नाही. प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेत अपघाती मूत्यू किंवा अपघातामुळे कायमचे अपंगत्वामुळे २ लाखाचे विमा स्वंंरक्षण तेही वार्षिक १२ रुपये हप्त्यात ( १८ ते ७० वयोमर्यादा ) मिळणार आहे. शिबिरात या योजनेत येणाऱ्या २०० व्यक्तींचा प्रथम वार्षिक हप्ता स्व.शिवाजी दादा शेलार मित्र मंडळाने भरला.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!