ठाणे

प्लास्टिक बंदीचा फायदा उचलला तोतया पालिका अधिकाऱ्यांनी… दुकानदाराला गंडवण्याच्या प्रयत्नात असणारी दुकली गजाआड…..

डोंबिवली : (शंकर जाधव) १ ऑक्टोबर पासून राज्यात प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानदारांवर पालिका प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संयुक्त रित्या कडक कारवाई सुरू केली आहे.या कारवाईमुळे दुकानदारांचे धाबे दणाणले आहे.याचा फायदा तोतया पालिका अधिकाऱ्यांनी घेण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याचा हा प्रयत्न फेल गेला आहे.या दुकलीला डोंबिवली रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.

जयेश साबळे व उबेर खान असे अटक केलेल्या तोतया पालिका अधिकाऱ्यांची नावे आहेत. डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ ओमकार सोसायटी मध्ये राहणारे चिमणराव चौधरी याचे म्हात्रे नगर परिसरात जयश्री नावाने किराणा मालाचे दुकान आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास चौधरी दुकानात असताना जयेश साबळे व उबेर खान हे दोघे त्यांच्या द्कानात आले.या दोघांनी आपण महानगर पालिकेचे अधिकारी असल्याची बतावणी करत त्यांच्याजवळील बनावट ओळखपत्र दाखवले. त्यानंतर या दोघांनी तुम्ही कोणत्या पिशव्या ठेवता असे विचारत चौधरी यांना दमात घेतले. दुकानात प्लास्टिक पिशव्या असून १० हजार रुपये दंडाची पावती फाडावी लागेल असे सांगत पावती फाडायची नसेल तर पाच हजार रुपये अशी मागणी केली .मात्र चौधरी यांना संशय आल्याने त्यांनी या दोघांकडे सखोल चौकशी केली.मात्र या दुकलीने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने या दोघांना दुकानदार चौधरी यांनी पकडले. झालेल्या प्रकारची माहिती डोंबिवली रामनगर पोलिसांना दिली असता पोलिसांनी जयेश साबळे व उबेर खानला अटक करत त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे.या दुकलीने अशा प्रकारे किती जणांना फसवले याचा तपास पोलीस करत आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!