ठाणे

दोन दिवसात वीज समस्येवर तोडगा न काढल्यास जेलभरो आंदोलन ; राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा


ठाणे (प्रतिनिधी) – आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होते. मात्र , गेल्या चार वर्षात भाजप सरकारच्या कार्यकाळात राज्यात वीज समस्या वाढीस लागली आहे. हि समस्या निकाली काढण्याऐवजी हे सरकार सणासुदीच्या काळातही भारनियमन केले जात आहे. जर ही समस्येवर दोन दिवसात तोडगा न काढल्यास जेल भरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता हुंडेकरी यांची भेट घेऊन दिला .
महावितरणने वीज टंचाई निर्माण होत असल्याने राज्यभर भारनियमन सुरु केले आहे. हे भारनियमन सुमारे ६ ते ७ तासांचे आहे. त्याव्यतिरिक्त मुंब्रा भागात अतिरिक्त ७ ते ८ तासांचेही भारनियमन केले जात आहे. त्यामुळे मुंब्रा शहर हे सुमारे १२ ते १४ तास अंधारात असते. परिणामी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकरणी आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक शानू पठाण, सिराज डोंगरे, आशरिन राऊत , राजन किणी, अनिता किणी, मेहराज खान, जफर नोमानी , हाफिज नाईक , रुपाली गोटे, सुलोचना पाटील, इम्रान सुर्मे , रेहान पितळवाला , ब्लॉक अध्यक्ष जावेद शेख आदींच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंते हुंडेकरी यांची भेट घेतली. यावेळी परांजपें यांनी महावितरण कंपनीला भारनियमनाबद्दल जाब विचारला.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!