महाराष्ट्र

जि.प. पालघरच्या सर्व कार्यालयात स्वच्छतेचा जागर….

पालघर : “स्वच्छ पालघर सुंदर पालघर” निर्माण करण्यासाठी सर्व प्रथम शासकीय कार्यलय स्वच्छ असणे आवशक आहे असे मत पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.मिलिंद बोरीकर यांनी व्यक्त केले आहे.

स्वच्छता पंधरवड्या अंतर्गत दि. १३ ऑक्टोबर २०१८ रोजी दुसरा शनिवार शासकीय सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषद पालघरचे सर्व कार्यलय आणि पंचायत समितींमध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांनी उपस्थित राहून आपले कार्यलय स्वच्छ करण्याच्या आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते.

या आदेशाचे पालन करत जि. प. अंतर्गत सर्व विभागां मध्ये सुटीच्या दिवशी उपस्थित राहून सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या कार्यालय स्वच्छ केले. या अभियान अंतर्गत कार्याल्यातील स्वच्छता, परिसर स्वच्छता , अभिलेख वर्गीकरण करून अनावश्यक कागदपत्रांची विल्हेवाट लाऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

प्रसंगी पाणी व स्वच्छता आणि सामन्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांनी विविध कार्यालयांना भेट देऊन स्वच्छता मोहिमेची तपासणी केली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!