गुन्हे वृत्त

मटन बनवले नाही म्हणून पत्नीच्या पायावर कोयत्याने वार

डोंबिवली  :    वारंवार तगादा लावून मटन बनवले नाही म्हणून एका सनकी पतीने चक्क आपल्या पत्नीच्या पायावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना कल्याणात घडली आहे. या प्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारी नुसार सनकी पती दशरथ ठाणगे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     कल्याण पश्चिमेकडील बेतूरकरपाडा येथील पंचमुखी मंदिरा समोर नंदगुंजन तोवर मध्ये दशरथ ठाणगे व त्यांची पत्नी चंद्रा ठाणगे राहतात .काल रविवार असल्याने दशरथ यांनी आपली पत्नी चंद्रा यांना मटन बनवण्यास सांगितले मात्र वारंवार मटन बनवण्यासाठी तगादा लावून हि मटन न बनवल्याने संतापलेल्या दशरथ यांनी कोयत्याने चंद्रा यांच्या पायावर वार केले .या हल्ल्यात चंद्रा यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्नालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी चंद्रा यांनी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी दशरथ विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!