मनोरंजन

डोंबिवलीत रेवाई नृत्य महोत्सव संपन्न  

????????????????????????????????????
डोंबिवली :-    आराधना फाईन आर्ट अकादमी डोंबिवली पश्चिम येथे गेली २३ वर्षे शास्त्रीय कथ्थक नृत्याच्या प्रशिक्षणासाठी सतत कार्यरत आहे.विविध उपक्रम संस्थेतर्फे सातत्याने सुरू असतात. असाच एक नविन उपक्रम डोंबिवलीत आराधना अकादमी विविध शास्त्रीय नृत्य शैलींवर आधारित रेवाई नृत्य महोत्सव आनंद बालभवन येथे पार पडला.
या महोत्सवात ओडिसी नृत्य प्रस्तुतीसाठी भुवनेश्वरहून डॉ. गजेंन्द्रकुमार पंड्या आणि त्यांची शिष्या आर्या नांदेे  अर्धनारी नटेश्वर … दुर्गा तांडव नृत्य प्रस्तुत करून बालभवनमधील खचाखच भरलेल्या रसिकांनीं टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना मानवंदना दिली.या कार्यक्रमात शास्त्रीय नृत्यासाठी डॉ. गजेंन्द्रकुमार पंड्या, तसेच लोककलेसाठी प्रसिध्द ढोलकीवादक पांडुरंग घोटकर यांचा राज्यमंत्री रविन्द्र चव्हाण यांच्या हस्ते `रेवाई` पुरस्काराने संन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रसिध्द गुरू जयंती माला मिश्रा,व डॉ.श्री गणेश चंदनशिवे (लोककला ऍकेडमीचे मुख्य) हे उपस्थित होते.आराधना फाईन आर्ट अकादमीच्या संयोजिका स्मिता मोरे यांनी हा महोत्सव दरवर्षी आगळ्या वेगळ्या स्वरूपात पार पडणार असल्याचे सांगितले. आराधनाच्याविद्यार्थ्यांनी गणेश वंदना नर्मदाष्टक दुर्गा स्तुती सादर केली..

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!