गुन्हे वृत्त

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई …..२०  जणांवर मोक्का , २३  जण तडीपार, २५  गुन्हेगार रडारवर

डोंबिवली  : कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती मध्ये वाढ झाल्याने शहरात दहशत पसरली होती.त्यामुळे नागरिक धास्तावले होते.गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करत गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे  गेल्या २१  दिवसांत ४  खुनी हलले करणाऱ्या टोळ्या मधील २०  गुन्हेगारांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. २३ गुन्हेगारांना  तडीपार करण्यात आले आहे . दरम्यान गुन्हेगाराकडून वारंवार गुन्हे घडत असून शहर गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी ३६  गुन्हेगारांना तडीपार करण्याची कारवाई सुरू असून चौकशी अंती त्यांना तडीपार केले जाणार आहे. तर २५  गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी दिली इथेच थांबणार असून या पुढे ही सातत्याने ही कारवाई सुरू राहणार यांच्याकडून पत्रकार परिषदेत दिली.

     कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात चैन स्नेचींग ,घरफोड्या ,हाणामारी यामुळे  धुमाकूळ घालत परीसरात एकच दहशत पसरवली होती.या वाढत्या गुन्ह्यांच्या आकडेवारी मुळे जणू पोलीस यंत्रणेला आव्हान दिले होते .अखेर या वाढत्या गुन्हेगारीला अंकुश घालण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे .या गंभीर गुन्ह्यामधील आरोपींना पोलिसांनी वेळोवेळी कारवाई करत अटक केली मात्र जामीन मिळवून पुन्हा हे गुन्हेगार कारवाया सुरूच ठेवत परिसरात दहशत पसरवत असल्याने संघटीत गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून या गुन्हेगारांचा मागमूस काढत  त्याच्यावर मोक्का अंतर्गत तसेच तडीपारीची कारवाई करत गुन्हेगारीचे कंबरडे मोडले आहे .गेल्या २१  दिवसत पोलिसांनी  ४ खुनी हलले करणाऱ्या टोळ्या मधील २०  गुन्हेगारांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून २३ गुन्हेगारांना  तडीपार करण्यात आले आहे . दरम्यान गुन्हेगाराकडून वारंवार गुन्हे घडत असून शहर गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी ३६  गुन्हेगारांना तडीपार करण्याची कारवाई सुरू असून चौकशी अंती त्यांना तडीपार केले जाणार आहे तर २५  गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर असल्यची माहिती अपर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी पत्रकार परीषदेत दिली .यामध्ये कोलशेवाडी पोलीस स्थानक अंतर्गत पाच ,बाजारपेठ पोलीस स्थानक अंतर्गत ७ ,तिलक नगर पोलीस स्थानकअंतर्गत ३ ,मानपाडा पोलीस स्थानक अंतर्गत पाच अशा एकूण २० तर इतर दोन जनावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तर १३ गावठी बनावटीचे कट्टे ,५ देशी पिस्टल ,३ गावठी रिव्हाल्वर अस एकूण २१ अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत .

  १ )  वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६६८ रिक्षाचालकांवर कारवाई

गेल्या १०  दिवसात वाहतूक नियमाची पायमल्ली करत रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांवर पोलिसानि धडक कारवाई सुरु करत त्यान वठणीवर आणले आहेत १२ तारखेपासून सुरु झालेल्या या कारवाई आजमितीला ड्रायव्हर सिटवर प्रवासी बसवणाऱ्या ४७४ ,गणवेश न घालणाऱ्या ५४४  ,रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ७९ तर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५७१ असा एकूण १६६८ जनावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

———————————————————————————————————————————————————————————-

  २ ) २१  दिवसांत ४ खुनी हल्ले दरोडेखोर चेन स्नेचिंग सराईत गुन्हेगारीच्या चार टोळ्या मधील २० गुन्हेगारांवर मोक्का

  • बाजारपेठपोलिस ठाण्याच्या हद्दीतील कपिलदेव मंडल राहणार रमाबाई आंबेडकर नगर कल्याण पश्चिम त्याचे  निमेश बगाडीया ,रोहन भालेराव,नरेश जाधव,प्रशांत देशमुख उर्फ पी.डी.देशमुख ,जगदीश सूर्यराव व प्रीतम लोंढे या आरोपी वर मोक्का  कारवाई  केली
  • टिळक नगर पोलीस ठाण्यात महेंद्र यादव या गुन्हेगाराची उत्तर प्रदेशच्या आंतरराज्य टोळीशी संबंध असून सोने चांदीच्या व्यापाऱ्यांवर फायरिंग रिंग करून धावणे आदी प्रकार करीत असे या टोळीतील गोपाळ यादव,विकास महेंद्र सिंग या तिघां वर मोक्का कारवाई केली
  • कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अंतर्गत शब्बीर आसिफअली सय्यद उर्फ जाफरी इराणी,इराणी वस्ती आंबिवली  याचे सहकारी हसन अजीज इराणी उर्फ जाफरी उर्फ सय्यद ,आशिया अजीज इराणी उर्फ जाफरी (महिला),अकि हसन फिरोज इराणी व अब्बास अमजद इराणी अश्या पाच इराणी रोबरी व चेन स्नेचींग करणार्या  आरोपीना मोक्का अंतर्गत कारवाई केली.
  • मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रमुख टोळीचा सूत्रधार शब्बीर उर्फ मोबाईल उर्फ मोबेल आसिफअली सय्यदउर्फ जाफरी इराणी  राहणार  इराणी वस्ती आंबिवली  याचेत्याचे  फैज्जल अफजल शेख ,अब्दुल्ला संजय जाफर इराणी ,ऑन सरफराज सेय्यद उर्फ जाफरी उर्फ इराणी ,फिज सरफराज सेय्यद उर्फ जाफरी इराणी आदी पाच आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!