महाराष्ट्र

बीजिंग आणि महाराष्ट्रादरम्यान पर्यटन, चित्रपट आदी क्षेत्रातील देवाणघेवाण वाढणार

बीजिंगच्या उपराज्यपालांनी घेतली पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट

मुंबई, दि. १७ : चीनमधील नागरिकांना बॉलिवूडच्या हिंदी चित्रपटांचे कमालीचे आकर्षण असून अनेक हिंदी चित्रपट तिथे बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवतात.भारतीय चित्रपटांचे तंत्रही खूप विकसित असून ते चीनी चित्रपट क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे, असे मत बीजिंगचे उपराज्यपाल डू फिजीन यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र आणि बीजिंगदरम्यान पर्यटन, चित्रपट,उद्योग, व्यापार, विद्यार्थी देवाण-घेवाण आदींचा विकास करण्यासंदर्भात आज त्यांनी राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली.त्यावेळी या दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रातील देवाण-घेवाणीबाबत चर्चा झाली.

चीनी नागरिकांना बॉलिवूडच्या चित्रपटांचे आकर्षण

चीनमध्ये होणाऱ्या चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपटांचे तर भारतातील चित्रपट महोत्सवांमध्ये चीनी चित्रपटांचे प्रदर्शन करण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली.पर्यटन मंत्री श्री. रावल यावेळी म्हणाले की, भारत आणि चीन देशातील नागरिकांच्या भावभावना आणि संवेदना एकच असल्याने बॉलिवूडचे चित्रपट चीनमध्ये लोकप्रिय ठरतात. दोन्ही देशातील चित्रपट व्यवसायाला चालना देण्यासाठी याचा निश्चित उपयोग करण्यात येईल.

चीनमध्ये बौद्ध धर्माच्या अनुयायांची संख्या अधिक आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील बौद्ध पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने यावेळी चर्चा झाली. महाराष्ट्रातील अनेक लेण्या या बौद्ध धर्माचा तसेच बौद्ध विचारधारेचा इतिहास जागृत करतात. चीनी बांधवांनी या लेण्यांना अधिकाधिक संख्येने भेट द्यावी.महाराष्ट्र आणि चीनमधील बौद्ध पर्यटन विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य तसेच प्रयत्न करेल, असे यावेळी मंत्री श्री. रावल यांनी सांगितले. या प्रस्तावास उपराज्यपाल डू फिजीन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

बीजिंग आणि महाराष्ट्रादरम्यान शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची देवाणघेवाण करण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली.

उपराज्यपाल डू फिजीन यांच्यासमवेत आलेल्या शिष्टमंडळात बीजिंगचे प्रसिद्धी महासंचालक यांग शुओ, उपमहासंचालक (परराष्ट्र व्यवहार) श्रीमती झांग क्यु, चीनचे मुंबईतील कौन्सुलेट जनरल टँग गुओकोई यांच्यासह हु जिंगलाँग, जी गाँगचेंग, वँग हैशान यांचा समावेश होता. बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम,माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, एमटीडीसीचे उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!