मुंबई

निर्मल नगरच्या पोशि भाग्यश्री सुतार यांची धडाकेबाज कामगिरी देवी विसर्जनाच्या मिरवणुकीत लागलेली आग तात्काळ शमवली

मुंबई  : नवरात्रोत्सवानिमित्त वांद्र्यातील खेरवाडी येथे जयदुर्गा मित्र मंडळाने देवीची प्रतिष्ठापना केली होती. 19 ऑक्टोबर 2018 रोजी सायंकाळी धुमधडाक्यात देवीच्या मूर्तीचे विसर्जनासाठी उपरोक्त मंडळाने मिरवणूक काढली. वाजतगाजत, फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना एका फटाका देवीचे मूर्ती ठेवलेल्या ट्रकमध्ये उडाला. मूर्तीच्या शेजारी केलेल्या सजावटीने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. मात्र त्यावेळी प्रसंगावधान राखत निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस शिपाई (बक्कल नं. ०६०२५८) भाग्यश्री सुतार यांनी तात्काळ पाण्याचा मारा करून वेळीच आग शमवून पुढील अनर्थ टाळला.

या धडाकेबाज कामगिरीबद्दल जयदुर्गा मित्र मंडळाने पोशि भाग्यश्री सुतार यांचे कौतुक करून तुमच्या रूपात खऱ्या अर्थाने दुर्गाचे दर्शन घडले, अशी स्तुती केली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!