महाराष्ट्र

शाश्वत स्वच्छता आराखडा निर्मिती कार्यशाळा मोखाडा येथे संपन्न …

मोखाडा: पालघर जिल्हा हागणदारी मुक्त झाला असला तरी गाव पातळीवर वयक्तिक स्वच्छतेचे मुल्य रुजविणे अन्यंत आवशक आहे या साठी शाश्वत स्वच्छता आराखडा निर्मितीसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन पालघर जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागा मार्फत मोखाडा तालुक्यात पतपेढी हॉल येथे करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत जिल्ह्यातील वैयक्तिकस्तरावरील भौतिक सुविधांची निर्मिती, दुरूस्ती व वापर, संस्थात्मक व सार्वजनिकस्तर भौतिक सुविधांचीनिर्मिती, दुरुस्ती व वापर , मैला गाळ व्यवस्थापन, स्वच्छता सुविधांची देखभाल आणि दुरुस्ती, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या घटकांचा विचार करून आवश्यक उपक्रमाच्या अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत, तालुक्याचा आराखडा या कार्यशाळेत करण्यात येणार आहे.

या कार्यशाळेत तालुक्यातील दोन गावांचा शाश्वत स्वच्छता आराखडा या प्रशिक्षांर्थीन कडून तयार करण्यात येणार आहे. तद्नंतर जिल्ह्यातील इतर तालुक्यान मध्ये ह्या प्रमाणे सादर आराखडे तयार करण्यासाठी हि प्रस्किशन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती पालघर जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.तुषार माळी यांनी यावेळी दिली.
कार्यशाळेत पंचायत समिति मोखाडा गटविकास अधिकारी श्रीम. संगीता भांगरे उपस्थित होत्या. प्रायमुव्ह पुणे, राज्य समन्वयक श्री.महेश कोडगिरे यांनी आराखडा तयार करतांना प्रत्यक्ष गावात गेल्यानंतर कुटुंबाकडून कोणती माहिती घ्यावयाची आहे याचे मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे सल्लागार, गट, समुह समन्वयक, सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आदि उपस्थित होते.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!