ठाणे

स्वामीनगर येथील नाल्यामध्ये पडून मृत्यू पावलेल्या बालक राघव यांच्या परिवारास २ लाखाची आर्थिक मदत 

* उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांनी केली मदत 
* खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते दिले धनादेश 
* स्वामीनगर येथील धोकादायक पुलाच्या कामाचा शुभारंभ 
अंबरनाथ दि. २८ अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील स्वामीनगर येथील रेल्वे ब्रिजखालील नाल्यावर असणारे पूल हे गेल्या १० वर्षांपासून धोकादायक झालेले होते. हि बाब येथील स्थानिक नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वारंवार अंबरनाथ नगरपरिषद व वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून या धोकादायक पुलाकडे गांभीर्याने लक्ष घालून नागरपरिषदेकडून ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला व प्रलंबित धोकादायक पुलाच्या कामाचा शुभारंभ आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते करण्यात आला. या पुलाचे कामाकरिता उपनगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक अब्दुलभाई शेख यांनी अथक प्रयत्न केलेले आहे. तसेच १० महिन्यांपूर्वी या धोकादायक पुलावरून राघव विरमुरगन नावाच्या अडीच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटूंबीयास उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्याकडून आर्थिक मदत म्हणून २ लाख रुपयांची मदत करण्यात आलेली असून त्याचा धनादेश व एफ.डी.चे प्रमाणपत्र देखील खासदार शिंदे यांच्याहस्ते आज देण्यात आला.
           याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, चंद्रकांत बोडारे, उपनगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक अब्दुलभाई शेख, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नगरसेवक किरणकुमार कांगणे, नगरसेविका छाया दिवेकर, समाजसेवक राजन मामा, शाखाप्रमुख विरन मुन्नूस्वामी, वेंकटेश यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            अंबरनाथ पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन लगत असलेल्या स्वामीनगर परिसरातील एका जुन्या पुलाला रेलिंग नसल्यामुळे या पुलावरून नाल्यात पडून राघव विरमुरगन या अडीच वर्षांच्या मुलाचा २१ डिसेंबर २०१७ रोजी मृत्यू झाला होता. सदरचा पूल हा अत्यंत जुना आणि ५० वर्षांपूर्वीचा असून तो जीर्ण झालेला आहे. यापूर्वीही सदर पुलावरून पडून अनेकांना दुखापत देखील झालेली आहे व काहींना आपले प्राणही गमवावे लागले आहे. हि बाब स्थानिक नगरसेवक व पालिकेचे उपनगराध्यक्ष अब्दूलभाई शेख यांनी गांभीर्याने लक्षात घेऊन अंबरनाथ नगरपालिकेकडे सतत पाठपुरावा करून सदर पुलाची पुनर्बांधणीसाठी ६० लाख रुपये मंजूर करून घेतलेले असून आज या कामाचा शुभारंभ खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते करण्यात आला. तसेच मृत्यू पावलेल्या कै. राघव विरमुरगन यांच्या कुटूंबियास उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांनी स्वतः २ लाख रुपयांची आर्थिक मदत केलेली असून त्याचा धनादेश देखील खासदार शिंदे यांच्याहस्ते आज देण्यात आला. यात त्याची आई नीता व वडील विरमुरगन यांना एक लाख रुपये रोख देण्यात आले व त्यांचा लहान मुलगा विरमुरगन (अडीच वर्षे) याच्या नावावर एक लाख रुपये फिक्स डिपॉजिट करून त्याचा एफ.डी. प्रमाणपत्रच्या रूपाने देण्यात आले, जेणे करून त्यांच्या लहान मुलाच्या भविष्यात कामी येईल. या पुलाचे काम मंजूर करून घेण्यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, तत्कालीन बांधकाम सभापती सदाशिव पाटील, नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे-धेंडे, आमदार डॉ. बालाजी किणीकर तसेच मुख्याधिकारी देविदास पवार, शहर अभियंता मनीष भामरे, राजेश तडवी, विनोद राठोड आदींनीही मोलाचे सहकार्य केलेले असून येत्या सहा महिन्यात ह्या पुलाचे काम पूर्ण करून तो स्वामीनगरच्या नागरिकांसाठी खुला करण्यात येईल, असा विश्वास अब्दूलभाई शेख यांनी व्यक्त केला व हा पूल नवीन बनवूनझाल्यानंतर स्वामीनगर परिसरातील शाळकरी विद्यार्थी व इतर नागरिकांनाही येथुन विविध ठिकाणी जाण्यासाठी सोयीस्कर होईल. असेही शेख यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!