ठाणे

कोपर रेल्वे स्थानकात होणार नवीन होम प्लटफॉर्म…शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश 

डोंबिवली  :-   डोंबिवलीजवळ असलेल्या कोपर रेल्वे स्थानकाची गर्दी वाढत असल्याने एकमेव असलेला पूल अरुंद असल्याने तो रुंद करावा अशी मागणी शिवसेनेने केली होती. शिवसेनेच्या  या प्रयत्नाला यश आले आहे. रेल्वे प्रशासनाने या मागणीला पाठिंबा देत पुलाची रुंदी वाढवणे व होम प्लेटफार्म बांधावा म्हणून १  कोटी रुपये खर्च मंजूर केले  असल्याची माहिती जेष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी दिली.
कोपर रेल्वे स्थानकावर रोज सुमारे ४०  हजार प्रवासी प्रवास करतात व रोजचे उत्पन्न सुमारे अडीच लाख रुपये आहे. शिवाय दिवा – वसई मार्गावरील अप्पर कोपर स्थानकावरून पनवेल पर्यंत मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. कोपर स्थानकावर एकमेव पादचारी पूल असून गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.  म्हणून शिवसेना खासदार डॉ . श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून पुलाची रुंदी वाढवण्यात यावी अशी मागणी केली होती . शिवाय फलाट क्रमांक एक वरून पश्चिमेला जाण्यासाठी डोंबिवली प्रमाणे होम प्लेटफार्म करावा अशी सूचना त्यांनी केली होती.  रेल्वे प्रशासनाने या मागणीला पाठिंबा देत पुलाची रुंदी वाढवणे व होम प्लेटफार्म बांधावा म्हणून १  कोटी रुपये खर्च मंजूर केले आहे. डोंबिवली प्रमाणे पश्चिमेला बाहेर पडण्यासाठी प्रवाशांना पुलाचा वापर करण्याची गरज पडणार नाही व एक नंबर फलाटावरील  प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी पुलाची गरज लागणार नाहीं. साध्या कोपर पूल ८  फूट रुंद असून तो १६  फूट म्हणजे दुप्पट रुंद होणार आहे तर अप्पर कोपर स्टेशन जाणारा पूल १२ फूट आहे तो २४ फूट म्हणजे दुप्पट होणार आहे .

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!