ठाणे

पार्ले बिस्किटमध्ये आढळल्या आळ्या…अंबरनाथच्या सुपर मार्केट मधील प्रकार

अंबरनाथ दि. ३१ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
पार्ले कंपनीच्या टॉप पार्ले बिस्कीटमध्ये आळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. हे बिस्कीट खाल्ल्याने महिलेला उलट्या होऊन त्यांची प्रकृती बिघडली आहे.

अंबरनाथ पूर्वेकडील शिवगंगानगर भागात राहणाऱ्या अशोक देसाई यांच्या पत्नीने पटेल आर मार्टमधून १६ ऑक्टोबर रोजी पार्ले टॉप बिस्कीटची खरेदी केली होती. सोमवारी सकाळी देसाई यांनी हे बिस्कीट खाल्ले. मात्र काही वेळात त्यांना मळमळ होऊन उलट्या झाल्या. तेव्हा बिस्कीटचे पॅकेट पूर्ण फोडून पाहिले असता, त्यात आळ्या पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. देसाई यांनी तात्काळ पटेल आर मार्टमध्ये जाऊन याची तक्रार केली. त्यावेळी दुकानदाराने त्यांना पार्लेच्या कस्टमरकेअरला फोन लावून दिला. मात्र त्या ठिकाणाहून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर देसाई कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या संबंधी तक्रार केल्याने कंपनीच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पार्ले कंपनीला या संबंधी तक्रार केली असून कंपनी यापुढील निर्णय घेईल. असे सुपर मार्केट कडून सांगण्यात आले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!