ठाणे

भडकत्या महागाई विरोधात जनतेसोबत फक्त शिवसेनाच…”स्वस्त दरात फराळ साहित्याचे वाटप” ….. शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांची संकल्पना ……नागरिकांची अलोट गर्दी

अंबरनाथ दि. ०१ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
दरवर्षीप्रमाणे यंदाही भडकत्या महागाई विरोधात जनतेसोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या संकल्पनेतून खुंटवली विभागातर्फे दिपावली निमित्त ५० टक्के सूट देत स्वस्त दरात “फराळाच्या साहित्य वाटपाच्या” कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ पश्चिमेकडील भवानी चौक याठिकाणी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन शहरप्रमुख अरविंद वाळेकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर व नगरसेवक निखिल वाळेकर यांनी केले आहे. फराळाचे साहित्य घेण्याकरिता नागरिकांनी सकाळपासूनच अलोट गर्दी केली होती.
तसेच २ किलो रवा, १ किलो साखर, २ किलो मैदा, १ किलो डालडा, १ किलो पामतेल, १ किलो जाडे पोहे, २५० ग्राम डाळीया, २५० ग्रॅम शेंगदाणे व ५० ग्राम चिवडा मसाला एवढ्या वस्तूंची खरेदी बाहेर दुकानात केल्यास एकूण रु. ६०१/- लागतात. तर या सर्व वस्तूंचे शिवसेनेच्या वतीने फक्त रु. ३००/- घेऊन अर्ध्या किंमतीत दिले जात आहे. ५ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी दिली. त्याचबरोबर फराळ साहित्यासोबत रांगोळी, पणती,पुरुष व महिलांचे कपडे, आकाश कंदील इतर गोष्टी देखील अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. असेही वाळेकर यांनी सांगितले.
कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, नगरसेवक निखिल वाळेकर, शाखाप्रमुख व विभागप्रमुख आदींच्या हस्ते या फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले.
कडक उन्हाचा त्रास नागरिकांना होऊ नये याकरिता शिवसेनेच्या वतीने रांगेत उभे असणाऱ्या नागरिकांना बिस्कीट व पाणी देखील पुरविण्यात आले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!