ठाणे

अंबरनाथ मोरीवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीमध्ये भीषण आग ; तीन कर्मचारी जखमी

अंबरनाथ दि. ०५ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
          पश्चिमेकडील मोरीवली एमआयडीसी परिसरात असलेल्या एका केमिकल कंपनीमध्ये अचानक भीषण आग लागल्यामुळे कंपनीत ठेवलेला लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे व या आगीत स्फोट देखील झाल्याने आजूबाजूचा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच या दुर्घटनेत कंपनीतील तीन कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
           मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ पश्चिमेकडील मोरीवली एमआयडीसी परिसरात असलेल्या पेसिया केमिकल कंपनीत सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. ही माहिती मिळताच अंबरनाथ नगरपरिषद अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. बघता-बघता आगीने भीषण रूप धारण केल्याने आनंदनगर एमआयडीसी, कल्याण डोंबिवली व उल्हासनगर येथील अग्निशमन दलही आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. लागलेल्या आगीत कंपनीतील केमिकलने भीषण पेट घेतल्यामुळे मोठा स्फोट देखील झाला. ज्यामुळे आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर आग ही कशामुळे लागली त्याचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नाही. सदर आगीमध्ये कंपनीत ठेवलेल्या लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला असून कंपनीतील तीन कर्मचारीही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!