ठाणे

ठाणे महानगर पालिका झालीय सेटींगचा अड्डा – निलेश राणे यांचा आरोप

ठाणे (प्रतिनिधी)- ठाणे महानगर पालिकेमध्ये बिल्डरांच्या फायद्यासाठी आरक्षणे बदलण्याचा धंदा सुरु करण्यात आलेला आहे. आता आम्ही निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता आम्ही वाट बघत आहोत. आयुक्त काय कारवाई करतात, ते आम्ही बघतो; त्यानंतर स्वाभीमानी स्टाईलने उत्तर दिले जाईल. सध्या ठाणे महानगर पालिका ही सेटींगबाजांचा अड्डा झालेला आहे. येथे सर्वच राजकीय पक्ष हे या सेटींगमध्ये गुंतलेले आहेत, असा आरोप महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांनी केला.
मा. खा. निलेश राणे यांनी आज ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन थिम पार्क घोटाळा, मॉडेला येथील स्मशानाचे आरक्षण उठवून तेथे नाट्यगृह बांधण्याचा प्रस्ताव आणि विस्थापितांचे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या भूखंडावर पुन:र्वसन करावे, या मागण्यांचे निवेदन दिले. या नंतर शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
राणे म्हणाले, सन 2013 मध्ये मनोज शिंदे यांनी मॉडेला चेक नाका येथे स्मशानभूमी उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव मंजूर झालेला असतानाही आता त्या भूखंडावरील आरक्षण बदलून तेथे नाट्यगृह किंवा संशोधन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करुन घेण्यात आलेला आहे. बिल्डरांच्या फायद्यासाठी हे आरक्षण बदलण्यात आलेले आहे. थिम पार्कचे काम चुकीच्या पद्धतीने झालेले असतानाही ठेकेदाराला पैसे देण्यात आलेले आहेत. हा प्रकार काय आहे, देसाई यांनी कर्जत येथे उभारलेले तीम पार्कही असेच स्वत:च्या फायद्यासाठी उभारण्यात आलेले आहे. या प्रकरणात 100 टक्के भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे आयुक्तांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी आपण केली आहे. जर आयुक्तांनी कारवाई केली नाही तर आपण रस्त्यावरचे आंदोलन तर उभारुच शिवाय न्यायालयातही दाद मागू. ठाणे पालिकेमध्ये सर्वच पातळ्यांवर बिल्डरांचा फायदा केला जात आहे. सव कारभार सेटींगचाच आहे. सत्ता आपली, पालकमीं आपला म्हणून येथे मनमानी सुरु आहे. इतर राजकीय पक्षही त्यामध्ये सामील आहेत. या सेटींगनेच ठाण्याची वाट लावली आहे.
सिंधुदुर्गातील मासेमारीच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केले. गोव्यातील मच्छिमार कोकणात येऊन माससेमारी करीत आहेत. एलईडी आणि पर्सीसीन पद्धतीची ही मासेमारी आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील 900 मच्छिमार कुटुंबियांची परिस्थिती हालाखीची झाली आहे. आता हे सहन केले जाणार नाही. गोव्यातील सत्ताधार्‍यांकडे पैसा असल्यामुळे ते हा डाव रचत असतील तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल. गोवा सरकारने माणूसकीचा धर्म पाळला पाहिजे. अन्यथा, समुद्रात संघर्ष उफाळून येईल. आता आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. मात्र, अशा धमक्यांना राणे कुटुंबिय घाबरत नाही. सिंधुदुर्गचे पालकमंत्री हे पोकळ असल्याने गोव्याचे फावत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. राणेंचे गोव्यात हॉटेल असल्याचे यावेळी पञकारांनी विचारले असता, गोव्याचे मच्छिमार हे अनधिकृतपणे मासेमारी करीत आहेत. पण, आमचे हॉेटेल 15 वर्षांपासून अधिकृत आहे, असे सांगितले.
राम मंदिराच्या मुद्यावर ते म्हणाले की, बाळासाहेबांचे स्मारक ज्यांना बांधायला जमले नाही. त्यांनी राम मंदिर बांधण्याची भाषा करु नये. विटा नेऊन ठेवणार कुठे? आधी संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊ सेटींग केली आहे. त्यानंतरच हे उत्तर प्रदेशात जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाचा निर्णय 15 नोव्हेंपर्यंत होणार आहे. पण, मराठा मोर्चा ज्या दिशेला जाईल. त्या दिशेला आपणही जाणार आहोत, असे त्यांनी नमूद केले. तर, प्रकाश आंबेडकर हे समाजा-समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!