साहित्य

पु.ल.जन्मशताब्दी महोत्सव २०१८ चे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई दि. ८ :- राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकदमी मुंबई यांच्या वतीने आयोजित पु.ल.जन्मशताब्दी महोत्सव २०१८ चे उद्घाटन आज सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथील मिनी थिएटरमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, ज्येष्ठ दिग्ददर्शक राजदत्त, दिनेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर नाट्यगृहात आज पासून सुरु झालेला हा पु.ल. जन्मशताब्दी महोत्सव २०१८ हा १८ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. हा महोत्सव इथपर्यंत मर्यादित न राहता जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम या साजरे होणार आहे.

सध्याच्या जमान्यात सोशल मीडियाचे आव्हान आहे, परंतु आजही पुल,गदिमा आणि बाबूजी यांचे गीत,संगीत व साहित्य तितक्याच ताकदीचे व दर्जेदार आहे. महाराष्ट्राच्या या ज्येष्ठ आणि कृत्ववान व्यक्तींचे साहित्य व संस्कृतीचे संचित युवा पिढीपर्यंत पोहचविण्याचे कार्य आम्ही शासनाच्या माध्यमातून करीत आहोत,असे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. शासनाच्या या सकारात्मक प्रयत्नातून महाविद्यालयीन तरुण-तरूणीच्या माध्यमातून किमान १०० नवीन संगीतकार, साहित्यकार व गीतकार यांना प्रेरणा मिळू दे, अशी अपेक्षाही श्री. तावडे यांनी व्यक्त केली. शुभारंभाच्या कार्यक्रमानंतर वक्ता दशसहस्त्रेशु हा पुलंच्या दुर्मिळ भाषणाचा दृक-श्राव्य कार्यक्रम पार पडला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!