ठाणे

हायमास्टच्या प्रकाशाने उजळले डोंबिवलीतील कोपरगाव…

डोंबिवली : ( शंकर जाधव )दिवाळीत मोठा प्रकाश देणारे हायमास्ट दिवे बसवल्याने डोंबिवलीजवळचा कोपर गाव उजळून निघाले. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षा असलेल्या डोंबिवलीच्या कोपर गावात एलईडीचे हायमास्ट दिवे लागल्याने ग्रामस्थांनी दिवाळीत दिपोत्सव साजरा केला.

शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या कोपरगाव प्रभागात विविध चौकात हायमास्ट दिव्यांच्या टॉवरचे उद्घाटन करण्यात आले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या हस्ते कोपरगावातील नव्वद फुटी रस्त्यावरील दिव्यांचे उदघाटन उत्साहात करण्यात आले. यावेळी नगरसेविका गुलाब म्हात्रे, जिल्हा संघटक लता पाटील,माजी नगरसेवक तात्या माने,महिला संघटक किरण मोंडकर, मंगला सुळे, कविता गावंड आदी मान्यवर उपस्थित होते. सदानंद थरवळ यांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या कार्याबद्दल माहिती देताना म्हणाले की, गावात नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यामुळे कोपरगावात विकासकामे होत आहेत. कोपर रेल्वे स्टेशनला जंक्शनचा दर्जा प्राप्त झाल्याने कोपर गावास महत्व आले आहे. दळणवळणाच्या दृष्टीने कोपर लोअर व कोपर अप्पर स्टेशन महत्वाचे आहेत. त्यासाठी या भागातील नागरी सुविधांसाठी नगरसेवक रमेश म्हात्रे सतत असतात. कोपर गावात निसर्गनिर्मित सुंदर असा खाडीकिनारा लाभला आहे. या किनाऱ्यावर चौपाटी तयार करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी नव्वद फुटी रस्ता गावच्या योगदानातून करण्यात आला आहे. या रस्त्यावरील चौकात दिव्यांचे या भागात उंच टॉवर उभारण्यात आले आहेत. बारा मीटर टॉवरवर सहा प्रखर दिव्यांमुळे गावातील परिसर उजळून झाला आहे. पाच लाख रुपांचा निधी यासाठी खर्च झाला असला तर नगरसेवक म्हात्रे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. कोपर स्टेशनकडून या रस्त्याचे रुंदकरण करण्यात आले असून येथील चौकात दुसऱ्या मोठ्या दिव्याचा टॉवर उभारण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. रात्री रेल्वेने येणाऱ्या प्रवाश्यांना याचा लाभ होऊ शकतो. सखाराम कॉम्प्लेक्समध्ये तिसरा टॉवर उभारण्यात आला आहे. या टॉवरच्या लख्ख प्रकाशामुळे तेथिल रहिवासी आंनदी झाले आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!