ठाणे

डोंबिवलीकरांतील वनराई प्रदर्शनात आयुर्वेदिक वनस्पतींची माहिती …

डोंबिवली :- ( शंकर जाधव  )  वनराई प्रतिष्ठान डोंबिवली माध्यमातून गेली अनेक वर्षे कृषी, नर्सरी आणि आयुर्वेद २०१८ या वनराई प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शांत कृषी विषयक सुमारे शंभर स्टॉल उभारण्यात आले असून त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती, आयुर्वेद नर्सरी, कोकण कृषी विद्यापीठ, महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद तसेच ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण कृषी विभागाने या वनराई प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. प्रदर्शांत आयुर्वेदिक वनस्पतींची मांडणी करण्यात आली असून त्या बाबतचे मार्गदर्शन कृषी तज्ञाकडून दिले जात आहे.

महापालिकेच्या ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलात हे भव्य प्रदर्शन उभारण्यात आले असून प्रदर्शन १० ते १८ नोव्हेंबर कालावधित सर्वांसाठी खुले आहे. शनिवारी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, टाटा कंपनीचे डेव्हीड आवळे, विकास देसले, नगरसेवक मोरेश्वर भोईर, साई शेलार, शशिकांत कांबळे, राजू शेख आदी उपस्थित होते.

      यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, कृषी खात्यातर्फे या संबंधीची माहिती देण्याचे काम येथे होत आहे. घरांमध्येही वनस्पतीची लागवड करता येते. घरात वनस्पती किती महत्वाच्या असतात. घरातील झाडांना ऑक्सिजन कसा मिळेल हे अशा प्रदर्शनामुळे कळते. आजूबाजूच्या परिसरात पावसाळ्याचा सिझन सुरु झाला. ग्रामीण विभागात जास्तीत जास्त प्रमाणात झाडांची लागवड कशी होईल असा प्रयत्न वनराई आयोजाकांचा असतो. त्यांच्या या प्रयत्नामुळे परिसरातील शहरी भागात होणारे प्रदूषण काही प्रमाणत कमी होण्यास मदत होत असून वनराई प्रतिष्ठान यासाठी सतत झटत असते. वनराई प्रतिष्ठान तर्फे उभारण्यात आलेल्या हिरवाई प्रदर्शनाला डोंबिवलीकरांनी भेट देऊन येथील आयुर्वेदी वनस्पतींची माहिती घ्यावी.ज्येष्ठ नगरसेवक तथा कडोंमपाचे माजी स्थायी समिती सभापती रमेश सुकर्या  म्हात्रे, आर.सी.एफ, केडीएमसी, नगरसेवक महेश पाटील, भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विकास देसले आदींचे वनराई आयुर्वेद प्रदर्शनाला प्रायोजकत्व लाभले आहे. प्रदर्शनात कृषी विषयक सुमारे शंभर स्टॉल उभारण्यात आले असून त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती,आयुर्वेद नर्सरी, कोकण कृषी विद्यापीठ, महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद तसेच ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण कृषी विभागाने या हिरवाई प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. प्रदर्शांत आयुर्वेदिक वनस्पतींची मांडणी करण्यात आली असून त्या बाबतचे मार्गदर्शन कृषी तज्ञाकडून दिले जात आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!