नवी मुंबई

नवी मुंबई महानगरपालिकेतील ४४८ पदांची भरती ऑनलाईन पद्धतीने, पारदर्शकपणे होणार

ठाणे, दि. १५ : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आकृतीबंधास महाराष्ट्र शासनाची मंजुरी प्राप्त झाली असून आरोग्य व अग्निशमन विभागामध्ये  विविध संवर्गातील ४४८ पदांची भरती महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी कॉर्पोरेशन लि. यांचेमार्फत १६, १७ व १८ नोव्हेंबर २०१८ रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

५५ केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने

ही परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण ५५ केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. ही परीक्षा प्रक्रिया पूर्णत: पारदर्शक पद्धतीने पार पडावी याकडे महापालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांनी आरंभापासून विशेष लक्ष दिले असून ऑनलाईन प्रक्रियेमुळे ही परीक्षा मानवी हस्तक्षेपाविना सुनियोजित पद्धतीने पार पडणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत ५५ केंद्रांवर आरोग्य विभागाच्या स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ (१३० पदे), प्रयोगशाळा तंत्रज्ञान (४ पदे), ई.सी.जी. तंत्रज्ञ (७ पदे), रक्तपेढी तंत्रज्ञ (३ पदे),ऑक्झिलरी नर्स / मिडवाईफ (३२ पदे), शस्त्रक्रियागृह (१२ पदे) अशा ६ संवर्गातील एकूण १८८ पदांकरिता तसेच अग्निशमन विभागाच्या विभागीय अग्निशमन अधिकारी (एक पद), अग्निशमन केंद्र अधिकारी (२ पदे), अग्निशमन प्रणेता (१० पदे), अग्निशामक (२०८ पदे),वाहनचालक – अग्निशमन (३९ पदे) अशा ५ संवर्गातील एकूण २६० पदांकरिता म्हणजेच एकूण ४४८ पदांकरिता ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे.

सुरळीत व पारदर्शक पद्धतीने

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक केंद्रावर एका निरीक्षकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. आरोग्य व अग्निशमन या विभागांचे कामकाज अधिक गतिमान व्हावे या दृष्टीने ही पदभरती अतिशय महत्त्वाची असून ही परीक्षा प्रक्रिया सुरळीत व स्वच्छ पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकडे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. ही संपूर्ण परीक्षा प्रक्रिया सुनियोजित ऑनलाईनरित्या घेण्यात येत असून परीक्षा देणाऱ्या कोणत्याही अर्जदाराने याबाबत कसल्याही भूलथापांना व आमिषांना बळी पडू नये असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!