मुंबई

“कसाब आणि मी” पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

मुंबई :  26/11! जगभरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये गणला जाणारा भयानक हल्ला! मुंबापुरीत 26 नोव्हेंबर 2008 साली 10 दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात मुंबई पोलिसांसह इतर सुरक्षा यंत्रणांनी धडाकेबाज कारवाई करून 9 दहशतवाद्यांचा मुर्दा पाडला. या हल्ल्यात एकापेक्षा एक असे पोलीस अधिकारी, कर्मचारी व कमांडर शहीद झाले. तसेच परदेशी नागरिकांसह भारतीय मृत्युमुखी पडले होते. मात्र शहीद तुकाराम ओंबळे यांच्यामुळे हाती लागलेला एकमेव जिवंत दहशतवादी म्हणजे अजमल आमीर कसाब! छाताडावर गोळ्या झेलूनही तुकाराम ओंबळे यांनी कसाबच्या मुसक्या घठ्ठ आवळून धरल्या होत्या.

कसाब हाती लागल्यामुळे दहशतवाद्यांचा मुंबईवरील हल्ल्याचा कट जगासमोर आला. या हल्ल्याचा तपास तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश महाले यांनी केला. तपासादरम्यान कसाबचा आलेला अनुभव रमेश महाले हे “26/11 कसाब आणि मी” या पुस्तकाच्या रुपात जगासमोर आणत आहेत. या पुस्तकाचे शब्दांकन अमित गोळवलकर यांचे आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन 26/11 च्या पूर्व संध्येला (5:30 वाजता) अर्थात 25 नोव्हेंबर 2018 रोजी महाराष्ट्र पोलीस महासंचालक श्री दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते होणार आहे.
हा प्रकाश सोहळा मुंबई मराठी पत्रकार संघ, लोकमान्य टिळक सभागृह, पहिला मजला, महापालिका मुख्यालयासमोर, आझाद मैदान, मुंबई 4000 01 येथे होणार आहे.
सदर पुस्तक सर्वत्र उपलब्ध होणार आहे. 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस, जवानांना आणि नागरिकांना श्रद्धांजली म्हणून जरूर वाचावे!

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!