राष्ट्रीय  सागरी जलतरण स्पर्धेत डोंबिवलीतील यश जिमखान्याचे सुयश  

डोंबिवली :   नुकतेच वेंगुर्ला येथे स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांनी भरविलेल्या राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेत डोंबिवली येथील यश जिमखान्याने २६ खेळाडू सहभागी झाले होते. ही स्पर्धा ५००० मीटर पासून ५ किलोमीटर अंतरापर्यंत होती या विशेष म्हणजे या स्पर्धेत ३ महिला  व ३ मुलींनी टॉप टेन मध्ये जिंकल्या.

 या स्पर्धेत भारतातून  १२०० पेक्षा जास्त स्पर्धक आले होते.

       यश जिमखान्याचे स्विमिंग प्रशिक्षक विलास माने यांनी २ महिन्यापासून खेळाडूंकडून या स्पर्धेसाठी कसून सराव करून घेताना स्विमिंगची माहिती, व टिप्स दिल्या होत्या. या स्पर्धेत संध्या गरदे ३ किमी सिल्वर मेडल ( दुसरा क्रमांक), निता बोरसे १ किमी- ब्राझ मेडल ( तिसरा क्रमांक) , साधना टिलवानी 1किमी. – (चौथा क्रमांक),  सृष्टि कदम ५ किमी ( आठवा क्रमांक) , आर्या जगताप २ किमी ( सातवा क्रमांक), गार्गी गरदे १ किमी – ( १० वा क्रमांक )  ये खेळाडूंनी या स्पर्धेत डोंबिवलीतील यश जिमखान्याचे नाव उंचावले. यश जिमखान्याचे राजू वडनेरकर, प्रशिक्षक विलास माने आणि विजयी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे. ओमकार कुलकर्णी, प्राजक्ता माने, अनुजा कोकरे, अथर्व कुलकर्णी, कशिश टिलवानी, कुणाल शिंदे, मल्लिका सुभेदार, दुर्वा भोईर, सिध्दी कदम,व्यंकटेश पतंगे, किर्तीश खाटोकर, किंजल खाटोकर, कोमल सोनार साक्षी परब ,सुजल कदम यांनी या राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेत सहभागी होवून दिलेल्या वेळेच्या आधी हे सागरी जलतरण अंतर पोहून पार केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!