गुन्हे वृत्त

ठाणे परिमंडळ 1 च्या पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! गहाळ, चोरी झालेले 5 लाख 10 हजार रुपयांचे 51 मोबाईल नागरिकांना केले परत

ठाणे :  परिमंडळ 1 चे उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी 3 डिसेंबर 2018 रोजी गहाळ, चोरीला गेलेले 5 लाख 10 हजार रुपयांचे 51 मोबाईल नागरिकांना परत केले.

गेल्या 3 महिन्यात ठाणे नगर, मुंब्रा, कळवा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांच्या तपासासाठी उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी विशेष पोलीस पथकांची निवड केली. या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. आर. भंडारे, पोलीस उपनिरीक्षक जी. ए. कोकण, हवालदार हिवाळकर, एस. टी. कदम, सावंत, पोलीस शिपाई समाधान पवार, पी. बी. गादेकर, पोलीस नाईक आकाश जाधव, एस. ई. चव्हाण, वारघडे व ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. डी. मालेकर, पोलीस उपनिरीक्षक के. जी. बाबर व पथकांनी धडाकेबाज कारवाया करून मोबाईल चोरट्यांना बेड्या ठोकल्या. या चोरट्यांकडून 5 लाख 10 हजार रुपयांचे 51 मोबाईल पोलीस पथकांनी जप्त केले.

सदर माेबाईल उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांच्या हस्ते नागरिकांना परत देण्यात आले. चोरीला गेलेले मोबाईल परत मिळाल्याने आनंदी झालेल्या नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. कर्तव्य दक्ष पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोबाईल चोरीला गेलेल्या नागरिकांनी विश्वास दाखवून संयम राखल्याने पोलिसांनी चोख तपास करत 3 महिन्यांत मोबाईलचा शोध लावला.

गेल्या 9 महिन्यांत अशाच प्रकारे तब्बल 37 लाख 98 हजार 750 रुपयांचे 351 मोबाईल परिमंडळ 1 च्या विशेष पथकाने जप्त केले आहेत. तसेच एकमेव ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल 33 मोबाईल चोरींच्या गुन्ह्यांचा उलघडा करून 35 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी 20 चोरट्यांना तुरुंगात धाडले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!