क्रिडा

 स्व. शिवाजी दादा शेलार स्मृती चषक सामन्यात वडवली क्रिकेट संघाचा दणदणीत विजय

डोंबिवली :-  ( शंकर जाधव )   स्व.शिवाजी दादा स्मृती चषक क्रिकेटच्या  अंतिम सामन्यात वडवली क्रिकेटसंघाने नवापाडा संघावर बाजी मारून  दणदणीत विजय मिळवला. विजेता वडवली संघास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण  यांच्या हस्ते स्व. शिवाजीदादा शेलार स्मृती चषक, २लाख रुपयांचा धनादेश असे परितोषिके देण्यात आले खंबाळपाडा येथील  स्व.शिवाजी दादा शेलार क्रीडांगणात पार पडलेल्या क्रिकेट सामन्यात प्रेक्षकांनी गर्दी केली होती.

      यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण,महापौर विनिता राणे, उपमहापौर उपेक्षा भोईर माजी नगरसेविका शिल्पा शेलार, नगरसेवक साई शेलार, भाजप जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे,कॉंग्रेस डोंबिवली ब्लॉग अध्यक्ष गंगाराम शेलार,डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष संजीव बिरवाडकर, नगरसेवक संदीप पुराणिक, राजन आभाळे, निलेश म्हात्रे, रवीसिंग ठाकूर, राजू शेख, दिलीप भंडारी, धर्मनाथ भोईर,तुळशीराम जोशी, वासुदेव पाटील, परेश जोशी,विनायक पाटील. चिंतामण पाटील, जनादन साळुंखे, दयानंद मुंडे,सुनील शेलार,ज्ञानेश्वर भोईर,एकनाथ साळुंखे, शरद शेलार,गुरुनाथ कापसे,दीपक बसागे,राजना शेलार, बाईबाई पाटील, स्वरा शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. या सामन्यात ग्रामीण भागातील एकूण ४८ संघांनी भाग घेतला होता. अंतिम सामन्यात वडवली क्रिकेट संघाने डोंबिवली पश्चिमेकडील नवापाडा क्रिकेट संघावर मात केली.उपविजेत्या नवापाडा क्रिकेट संघास गंगाराम शेलार यांच्या हस्ते स्व. शिवाजीदादा शेलार स्मृती चषक स्मृती चषक आणि १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. धर्मनाथ भोईर आणि शशिकांत कांबळे यांच्या हस्ते आदर्श संघ म्हणून आरसीसी संघास स्व. शिवाजीदादा शेलार स्मृती चषक देण्यात आला.संपूर्ण सामन्यात २०७ धावा आणि ७ गडी बाद करणाऱ्या विशाल पाटील या खेळाडूने संपूर्ण सामन्यात मालिकावीर ठरला. विशाल पाटील यास टीवीएस स्पोर्ट बाईक देण्यात आली. अंतिम सामन्यात कमलेश पाटील हा खेळाडू सामनावीर ठरला.गावदेवी प्रसाद हा क्रिकेट संघ चतुर्थ संघ ठरला. या संघास स्व. शिवाजीदादा शेलार स्मृती चषक आणि ५० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.तृतीय संघ म्हणून डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव संघास पारीतोषिक मिळाले.उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मोठा गाव क्रीक्रेत संघातील किरण पाटील यास बूट, घड्याळ आणि चषक देण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून वासर गावतील सुरेश दुधकर यास बूट, घड्याळ आणि चषक देण्यात आले. या सामन्यात ११४ धावा करणाऱ्या म्हणून नवापाडा क्रिकेट संघातील पिंट्या जोशी हा उत्कृष्ट फलंदाज यास  बूट, घड्याळ आणि चषक देण्यात आले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!