ठाणे

बसपाच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त  डोंबिवलीत अन्नदान वाटप 

डोंबिवली  :-  ( शंकर जाधव  )  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या  महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बसपाच्या वतीने अन्नदान वाटप करण्यात आले. डोंबिवली स्टेशन परिसरात लाल बावटा रिक्षा युनियनच्या वतीने स्वस्त जेवण देण्यात येते. या ठिकाणी बसपाच्या वतीने बसपाचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांनी  गरिबांना  मोफत अन्नदान केले. अन्नदान समयी युग फाउंडेशनच्या अध्यकक्षा  कल्पनाताई किरतकर  उपस्थित होत्या.

      डोंबिवलीतील  बसपाच्या महाराष्ट्र नगर येथील कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला भारत घडला नाही. हा भारत घडण्यासाठी बहुजनांच्या हाती सत्ता येणे गरजेचे आहे. यासाठी आपण संकल्प करुया हेच बाबासाहेबांना अभिवादन ठरेल असे दयानंद किरतकर म्हणाले.यावेळी कल्पना किरतकर, किरण दरबारे, मदन, सुरेश कुशालकर, रवीकिरण बनसोडे, कृष्णा वाघमारे, लता मोहिते, इंगळे, पराग वाघमारे, कृष्णा वाघमारे उपस्थित होते.या अभिवादन कार्यक्रमानंतर डोंबिवली येथील महापालिकेच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास किरतकरांनी पुष्पहार अर्पण केला.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

ठाणे

Advertisements

मुंबई

कोकण

error: Content is protected !!