ठाणे

एसटी महामंडळातील चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई यांना आता लिपिक पदावर पदोन्नतीसाठी २५ टक्के आरक्षण – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

मुंबई, दि. 06 : एसटी महामंडळातील चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई व तत्सम पदावरील कर्मचाऱ्यांना आता लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नती मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी लिपिक-टंकलेखक संवर्गामध्ये 25टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज येथे केली. एसटी महामंडळातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना या निर्णयाची अनोखी भेट देऊन मंत्री श्री. रावते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन केले.

चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई,नाईक, हवालदार, उद्वाहन चालक,मजदूर, परिचर, खानसामा,अतिथ्यालय परिचर, सफाईगार,सुरक्षा रक्षक, खलाशी, सहाय्यक माळी, माळी व स्वच्छक या पदावरील कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. राज्यात या पदावर सुमारे 1 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी विहित शैक्षणिक अर्हता पूर्ण करणारे कर्मचारी लिपिक-टंकलेखक पदासाठी पात्र ठरतील. अशा कर्मचाऱ्यांसाठी आता महामंडळातील लिपिक-टंकलेखक संवर्गामधील 25 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे महामंडळातील ज्या कर्मचाऱ्यांनी लिपिक -टंकलेखक पदासाठी आवश्यक शिक्षण घेतले आहे, त्यांचे शिक्षण वाया न जाता,आता त्यांना महामंडळातच पदोन्नतीची संधी मिळेल, असे मंत्री श्री. रावते यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!