गुन्हे वृत्त

बाईक जाळणाऱ्या दोन आरोपींना नौपाडा पोलीसांनी केली अटक

ठाणे :- ठाण्या मध्ये 6/12/2018 तारखेला पहाटे 3 ते 3:30 ते चारच्या सुमारास कौशल्या हॉस्पिटल जवळील गणेशवाडी येथे मोटार सायकलीनां आग लागली या आगीत 9 गाड्या जळून खाक झाल्या ,अचानक पणे अशा गाड्या जळाल्या मुळे आजूबाजूच्या परिसरात घबाराहाट निर्माण झाली ,गेल्या वेळी 2017 रोजी जुलै महिन्यात अशाच मोटार सायकली जाळण्यात आल्या होत्या नौपाडा पोलीसांनी परिस्थितीच गंभीर्या बघुन बारा तासाच्या आत दोन आरोपींना अटक केली .

विजय चंद्रकांत जोशी वय 22 राहणार गणेश वाडी व दुसरा अनिकेत अनिल जाधव वय 19 ही दोन आरोपींची नाव असुन हे दोघेही तिथेच राहणारे आहेत , हे दोघे येऊर येथे दारूची पार्टी करून रात्री 3 वाजता अनिकेत जाधव याच्या अँक्टिव्हा गाडीवरून गणेश वाडी येथे आले , त्यातील जोशी याने समोरच असलेल्या अँक्टिव्हा गाडीवर जाधव याच्या गाडीतून पेट्रोल काढुन अक्टिव्हा गाडीवर टाकुन ती पेटवून दिली , पण त्याच्या बाजुला असलेल्या गाड्यांनी पेट घेतला , आणि एकूण नऊ गाड्या जळाल्या त्यात एक गाडी आरोपीची सुध्दा होती
पोलीसांनी घटनास्थळावरिल सीसीटीव्ही तपासले असता त्या मध्ये हे दोघे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले , त्या दोघांना अटक करण्यात आली आहे , गाड्या जाळण्या मागचे कारण त्यांना विचारले असता , विजय जोशी याच्या नावाने पोलीस स्टेशन मध्ये दोन एनसी झाल्या होत्या , त्या मध्ये एक एनसी चोरीच्या उद्धेशाने झाल्या मुळे , त्या परिसरातील मुल चोर म्हणुन त्याला हीणवत होते त्याचा राग विजय जोशी याच्या मनात होता , एनसी करणाऱ्या फिर्यादी यांनी नवीन अक्टिव्हा गाडी घेतल्याची माहीती जोशी याला मिळाली होती , त्याचा राग काढण्या साठी त्याने गाडीवर पेट्रोल ओतुन ती पेटवून टाकली आणि विशेष म्हणजे ती गाडी वेगळ्याच इसमाची होती .

पोलीस उपायुक्त डॉ .स्वामी यांनी लोकांना आव्हान केल आहे त्यांनी घाबरू नये पोलीस डिपार्टमेंट सदैव त्यांच्या बरोबर आहे , अशा प्रकारची कुटलीही संशयास्पद घटना आढळल्यास पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा .

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!