गुन्हे वृत्त

खून करून पळालेल्या आरोपींना ठोकल्या बेड्या

मुंबई  :  खून करून पळालेल्या आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही धडाकेबाज कामगिरी साकीनाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील माने यांनी पोलीस पथकासह केली. या आरोपींना न्यायालयाने १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

१५ डिसेंबर २०१७ रोजी सिराज शेख हा मित्रासोबत रात्रीच्या वेळी घरी जात होता. पायी चालत साकीनाका परिसरातील परेरावाडी, मोहिली व्हिलेज येथील साईबाबा मंदिराजवळ येताच सिराज शेख व त्याच्या मित्राचे १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा, अरुण ऊर्फ गोली गुलाबचंद जैस्वाल (२२) व इरफान ऊर्फ मोनू सत्तार खान (२२) यांच्यासोबत भांडण झाले. त्यावेळी तिघांनी रस्त्याच्या कडेला पडलेल्या सिमेंटच्या विटाने सिराजला मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखामी झालेल्या सिराजचे उपाचारादरम्यान १६ डिसेंबर २०१७ रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
वर्षभरापासून साकीनाका पोलीस आरोपींचा शोध घेत असताना ८ डिसेंबर २०१८ रोजी पोलीस निरीक्षक सुनील माने यांना आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने साकीविहार मार्गावरील पिकनिक हॉटेलच्या शेजारील सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार अरुण ऊर्फ गोली गुलाबचंद जैस्वाल व इरफान ऊर्फ मोनू सत्तार खान तेथे येताच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. सदर गुन्हा रात्रीच्या वेळी घडल्याने तसेच कुठल्या प्रकारचे सीसीटीव्हीचे फुटेज उपलब्ध नसल्याने गुन्ह्याची उकल करण्याचे पोलिसांसमोर आवाहन होते. मात्र पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील माने यांना मिळालेल्या माहितीमुळे सदर गुन्ह्याची उकल झाली.
वर्षभरापूर्वी खून करून पळालेल्या आरोपींना परिमंडळ १० चे उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक रौफ शेख, पोलीस उपनिरीक्षक संदीप साळुंखे व पोलीस पथकाने बेड्या ठोकल्या.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!