गुन्हे वृत्त

डोंबिवलीत  उद्योजकाच्या बंगल्यावर दरेाडा

डोंबिवली :- ( शंकर जाधव) डोंबिवलीतील प्रसिद्ध  ‘इंडो अमाइन्सचे डायरेक्टर विजय पालकर यांच्या घरी बुधवारी पहाटेच्या सुमारास दरोडा पडला. यात रोख रक्कम व सोन्याचे दागिने असे एकूण ४० लाखाचा ऐवज दरोडेखोरांनी चोरीला गेला. घरातील एका सीसीटीव्ही कॅमरात एका दरोडेखोराचा चेहरा कैद झाला आहे. पालकर यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने डोंबिवलीतील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहे.

    विजय पालकर व  त्याची पत्नी बुधवारी रात्री मुंबईहून साडेबाराचे सुमारास घरी आले. बंगल्याच्या पाठीमागील वॉचमनच्या घराच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावली होती. पालकर यांना वॉचमनने फोन करून त्याच्या घराला बाहेरून कडी लावल्याचे सांगितले. पालकर हे बेडरूम मधून बाहेर आले आल्यावर त्यांना सर्व सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले.म्हणून त्यांनीपहिल्या व दुसऱ्या मजल्यावर धाव घेतली.दरोडेखोरांनी सर्व कपाटे फोडून रोख रक्कम,सोने चांदीचे दागिने असा मोठा ऐवज चोरीला केल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. घरात पाळलेला कुत्रा भुंकला नसल्याने या दरोड्यामागे ओळखीच्या माणसाचा हात असल्याचा संशय पालकर यांनी व्यक्त केला आहे. दरोडेखोरांनी घरातील दोन सीसीटीव्ही कॅमेरे तोडले असून एक सीसीटीव्ही कॅमेरा फिरवला. मात्र तरीही एका दरोडेखोराचा चेहरा या कॅमेरात कैद झाला आहे. बंगल्यात  दरोडयासाठी वापरलेली कटावणे,पहार,चाकू आदि साहित्य पडले आहे. दरम्यान डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी एका तरुणाची निर्घुण हत्या झाली होती.या घटनांमुळे डोंबिवली सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!